Turkey Earthquake : तुर्की, सीरियात भूकंपामुळे हाहाकार; 4 हजार मृत्यू, 15 हजारांहून अधिक जखमी

1 / 8

तुर्की-सीरियात सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपाने हाहाकार उडवला असून या भागातून हृदय पिळवटून टाकणारे फोटो व्हिडिओ समोर येत आहेत.

2 / 8

भूकंपामुळे आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय तर 15 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार मृतांचा आकडा 20 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा भूकंप यंदाच्या वर्षातील सर्वात मोठी आपत्ती ठरली आहे.

3 / 8

भूकंपाचे केंद्र तुर्कीमध्ये असले तरी त्याची झळ शेजारील सिरीयाला देखील बसली आहे. तुर्कीमधील गाझियनटेप इथं सोमवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 4.17 मिनिटांनी पहिला 7.8 रिश्टर स्केलचा भूंकप झाला.

4 / 8

भारतानं तुर्कीसाठी मदतीचा हात दिला असून बचावकार्यासाठी NDRFची टीम पाठवली आहे. त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या वस्तूंसह औषधांची मदत पाठवण्यात आली आहे.

5 / 8

साबिर खान नावाच्या ट्विटर युजर्सने एक हृदय पिळवटून टाकणारा फोटो टिपला आहे.

6 / 8

शक्तिशाली भूकंपामुळे तुर्कीसह सीरियातील अनेक इमारती कोसळल्या असून मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे.

7 / 8

भूकंपात मोठ्या प्रमाणात झालेल्या जीवितहानीमुळे तुर्की सरकारकडून 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

8 / 8

तुर्की, सीरियासाठी जगभरातील देशांनी मदतीचा हात दिला असून विविध देशांच्या टीम भूकंपबाधित प्रदेशात दाखल झाल्या असून बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे. (फोटो सौजन्य- ट्विटर)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube