Twitter Down: मोठी बातमी! पुन्हा X डाउन, हजारो यूजर्स चिंतेत
Twitter Down : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार पुन्हा एकदा एलोन मस्क यांचा एक्स (पूर्वीचे ट्विटर) डाऊन झाला आहे. सध्या हजारो वापरकर्त्यांना वेबसाइट आणि ॲप वापरताना समस्या येत आहेत.
आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट ‘डाउन डिटेक्टर‘ ने दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी 7:58 वाजता (यूएस वेळेनुसार 10:28 वाजता), हजारो अमेरिकन यूजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X नीट काम करत नसल्याबद्दल तक्रार केली आहे.
my twitter is broken, it’s not letting me see any tweets
— Coni 🎀🏳️⚧️ (@Coni9669) September 7, 2024
डाउन डिटेक्टर ने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतून वेबसाइटवर आतापर्यंत 7,743 यूजर्सनी तक्रार केली आहे. तसेच अनेक यूजर्सनी X ची वेबसाइट आणि ॲप योग्यरित्या लोड होत नसल्याबद्दल तक्रार केली आहे. तर काही जणांनी X च्या अकाउंटवर लॉग इन करू शकत नाहीत अशी तक्रार केली आहे. सध्या भारतात या आउटेजचा कोणताही विशेष परिणाम दिसून आलेला नाही.
डाउन डिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, भारतात या आउटेजचा कोणताही मोठा परिणाम झालेला नाही. आतापर्यंत, भारतातून फक्त 260 तक्रारी दाखल करण्यात आले आहेत.
शिंदेंना हव्यात 120 जागा, अजित पवार ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार, भाजप काय निर्णय घेणार?
भारतात बहुतेक लोक त्यांच्या X खात्यात लॉग इन करू शकत नसल्याची आणि मायक्रो-ब्लॉगिंगच्या कनेक्शनमध्ये समस्या येत असल्याची तक्रार करत आहे. तर दुसरीकडे काही दिवसापूर्वी एलोन मस्क यांचा एक्स डाऊन झाला असल्याची माहिती समोर आली होती.