पुन्हा एकदा X (Twitter) जागतिक आउटेजचा बळी; अनेक देशांत झालं डाऊन, वापरकर्त्यांच्या तक्रारी
X Platform Down : आज सकाळपासून एक्स (पूर्वीचे ट्वीटर) अचानक डाऊन झाले आहे. (Down) भारतातील अनेक वापरकर्त्यांना याची समस्या जाणवत आहे. त्याचबरोबर अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनचाही समावेश आहे. या प्रकारानंतर लोकांनी तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयी लोक तक्रार नोंदवत आहेत.
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो तर एलन मस्क डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
एकट्या अमेरिकेत डाउन डिटेक्टरवर 36,500 तक्रारी आल्या आहेत असं रॉयटर्सने म्हटलं आहे. याशिवाय कॅनडामध्ये 3300 आणि इंग्लंडमध्ये 1600 तक्रारी आल्या आहेत. यावरून जागतिक स्तरावर ट्वीटर डाऊन झाल्याचं समोर आलं आहे. त्याचा परिणाम भारतातही दिसून आला आहे. भारतातील अनेक लोकांना या समस्या जानवत आहेत. त्याबाबत लोक आपली मत व्यक्त करत आहेत.
युक्रेन अन् इस्त्रायल युद्धाला बायडनच जबाबदार; एलन मस्कच्या मुलाखतीत भडकले ट्रम्प
आउटेज वेबसाइट्सबद्दल डाउनडिटेक्टरवरही अनेकांनी पोस्ट करणे सुरू केले. रात्री 9 नंतर, अनेक वापरकर्त्यांनी X प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलं आणि स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत. यामध्ये यूजर्स त्यांच्या अकाउंटवरील पोस्ट पाहू शकत नाहीत. समथिंग वेंट राँग, ट्राय रिलोडिंग असा संदेश यूजर्सला पाहायला मिळत आहे.