नवी दिल्ली : हिंडेनबर्गचा रिसर्चचा रिपोर्ट हा भारत, भारतातील संस्था, देशाची प्रगती आणि महत्त्वाकांक्षांवर पद्धतशीर केलेला हल्ला आहे, असं म्हणत अदानी ग्रुपकडून (Adani Group) हिंडेनबर्गला ऊत्तर दिले आहे. यावेळी हा अहवाल स्वतंत्र, वस्तुनिष्ठ किंवा सखोल संशोधनानंतर तयार केलेला नाही, असंही अदानी ग्रुपकडून म्हणण्यात आलं आहे. आपल्या 413 पानांच्या उत्तरात, अदानी ग्रुपने अहवालात उपस्थित केलेल्या सर्व […]
पुणे : गुजरात दंगलीवर आधारित असलेली बीबीसीची (BBC) ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ डॉक्युमेंट्री (‘India: The Modi Question’ Documentary) वादात सापडली आहे. केंद्र सरकारने यूट्यूबवरील व्हिडिओ आणि ट्विटर लिंक ब्लॉक केल्या आहेत. असे असताना देखील पुण्यातील एफटीआयआय कॅम्पसमध्ये डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारची बंदी असतानाही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय […]
मागच्या आठवड्यातील देशात सर्वाधिक चर्चा झाली ती अदानी ग्रुपची (Adani Group). अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Report) या संस्थेने अदानी ग्रुपववर एक रिपोर्ट पब्लिश केला आणि जगभरात त्याची चर्चा झाली. त्या एका रिपोर्टमुळे अदानी ग्रुप आणि गौतम अदानी यांना प्रचंड मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. अदानी ग्रुपला बसलेला हा फटका भारतीय शेअर बाजारालाही बसला […]
औरंगाबादः “सर्व्हेवर अंदाज बांधता येत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पावसात एक सभा झाली होती. त्या सभेने सगळे गणित बदलून टाकले.” असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ (sanjay shirsat) यांनी सी वोटरच्या सर्वेवर प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच आलेल्या सी वोटर ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला ३४ […]
पुणे : “जिवंतपणी करसेवकांचे हत्यारे म्हणून त्यांची अवहेलना करणाऱ्या भाजप सरकारला मुलायम यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची गरज भासली.” अशा शब्दांत सामनाच्या (Samana) अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. याच अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, “अयोध्या आंदोलनात त्यांनी करसेवकांवर गोळय़ा चालवून जो रक्तपात घडविला त्यामुळे ते देशभरातील हिंदू समाजाचे शत्रूच बनले ते कायमचे. […]
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नक्की कोणाला संधी मिळणार ? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) हे आज दिल्लीहून थेट पुण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार घोषित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची […]
पुणे : कसबा विधानसभा (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीसाठी नक्की कोणाला संधी मिळणार ? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण यामध्ये आता एक नवीन माहिती समोर येत आहे. राज्यातील भाजपकडून केंद्रीय निवड समितीला ५ नावांचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे अंतिम निर्णय केंद्रीय समितीकडून जाहीर केला जाईल. असं सांगण्यात येत आहे. पाच नावे कोणाची ? प्रदेश […]
पुणे : पुणे मेट्रोचा (Pune Metro) तिसरा टप्पा असलेला गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर न्यायालय आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गिकेवरील मेट्रो २६ जानेवारीपर्यंत धावेल, असं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आश्वासन दिले होते. पण २६ जानेवारी उलटून गेल्यांनतरही मेट्रो मार्गिका न सुरु झाल्याने काँग्रेसकडून यावर टिका करण्यात आली आहे. २६ जानेवारीचा मुहूर्त […]
हिंडेनबर्गचा (Hindenburg Research Report) अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अदानी समूहावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या प्रकरणी कारवाई करत सेबीने गेल्या वर्षभरात अदानी समूहाने केलेल्या गुंतवणुकीची आणि सौद्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच सेबी हिंडनबर्गच्या अहवालाचाही अभ्यास करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सेबी आधीच अदानी (Adani) ग्रुपच्या फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सची (FPIs) चौकशी करत आहे. या […]
मुंबई : पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशातील शाळकरी मुलांसाठी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम सरकारी असताना राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या आडून भारतीय जनता पक्ष शाळकरी मुलांमध्ये पक्षाचा प्रचार करत असून हे अत्यंत गंभीर असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य […]