“आज देशात संविधान धोक्यात आलं आहे, महागाई आणि गरिबीमुळे देश संकटात आहे. त्यामुळे जे आमच्यासोबत आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन भाजपविरोधात लढणार आहे.” असं उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांना दिले आहे. काल शरद पवारांनी (Sharad Pawar) 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की, नाही, हे आत्ताच कसं सांगणार? असं […]
“राजकारणातही काही लोक सकाळी नऊ वाजता नशा करत कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पहिलवानाला कुस्तीतून बादच व्हावं लागत.” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसापासून देवेंद्र फडणवीस हे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आक्रमक होताना दिसत आहेत. या ट्विटमधुन देखील ते पुन्हा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना दिसत आहेत. देवेंद्र […]
शार्क टँक मधील शार्क आणि Shadi.com चे संस्थापक अनुपम मित्तल यांनी गुगलच्या बिलिंग सिस्टिमला ‘बेकायदेशीर’ असल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी गुगलला ‘डिजिटल ईस्ट इंडिया कंपनी’ म्हटले आहे. उद्योगपती असलेल्या मित्तल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की Google भारतीय कायद्यांचे उल्लंघन करून काम करत आहे आणि पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) अधिकारी याकडे लक्ष देतील. अनुपम मित्तल यांनी […]
Thackeray vs Shinde : शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरु झालेली शिवसेना कोणाची या कायदेशीर उत्तर मिळायला अजून वेळ जाणार आहे. कारण धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुप्रीम कोर्टातील आज होणारी सुनावणी रद्द झाली आहे. कोर्टाच्या आजच्या कामकाजात शिवसेनेच्या प्रकरणाचा समावेश नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हाबाबतच्या निर्णयाला ठाकरे गटाकडून कोर्टात आव्हान दिलं होत. त्यावेळी पुढील सुनावणीसाठी 24 एप्रिल […]
“नसबंदी करायची तर करा ना, तुमची राजकीय नसबंदी झाली आहे ना..” अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर केली आहे. संजय राऊत यांच्या जिभेची नसबंदी करा अशी टीका मनसेनेते संदीप देशपांडे यांनी केली होती यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या पाचोरा शहरात विविध कार्यक्रमांना […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याची माहिती समोर आली आहे. केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी धमकी देणारे पत्र मिळाल्याचा दावा केला आहे. सोमवारपासून (२४ एप्रिल) पंतप्रधान मोदींचा दोन दिवसीय केरळ दौरा सुरू होत आहे. पंतप्रधान मोदींच्या दोन दिवसीय केरळ दौऱ्यात प्राणघातक हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. केरळ दौऱ्यादरम्यान पंतप्रधान […]
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज आपला सरकारी बंगला सोडला आहे. कालपर्यंत त्यांनी सरकारी बंगल्यातील सर्व सामान रिकामे केले होते आणि त्यांनी संपूर्ण बंगला खाली केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीतील 12, तुघलक लेन हा सरकारी बंगला आज राहुल गांधी यांनी लोकसभा सचिवालयाकडे सोपवला. राहुल गांधी यांना दिलेल्या मुदतीनुसार आजच बंगला रिकामा करण्याची शेवटची तारीख होती. […]
देशाच्या विकासात उद्योगपतींची मोठी भूमिका आहे. कारण उद्योगपती हे फक्त व्यवसाय करत नाहीत तर समाजासाठी देखील ते खूप करतात. आदर पुनावाला त्याचं एक उत्तम उदाहरण आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी व्यक्त केले आहे. पुणे वैद्यकीय सेवा संशोधन प्रतिष्ठान यांच्यावतीने बाळासाहेब देवरस रुग्णालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, […]
देशाच्या राजकारणातील असलेले खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेचे प्रकाशन २०१५ साली झालं होत. आता या पुस्तकाचा भाग दोन लवकरच येणार आहे. त्यामुळे नव्या भागात शरद पवार नक्की काय खुलासे करणार आहेत. हे पाहणे महत्वाचे आहे. आगामी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या पुस्तकाचं प्रकाशन होणार असल्याचॆ […]
१९९५ साली शरद पवार यांनी अजित पवार, जयंत पाटील, आर आर पाटील अशी तरुण फळी तयार केली. त्यानंतर सध्या अजित पवार देखील राष्ट्रवादीमध्ये नवीन तरुण फळी तयार करत आहेत. अजित पवार म्हणाले की सध्या पुणे आणि नगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आमदारांची पूर्णपणे तरुण फळी आहे. सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी […]