“फक्त १० आमदार निवडून येऊ द्या, मुख्यमंत्र्यांचा गणपतीच करू”; कडूंनी थेट इशाराच दिला

“फक्त १० आमदार निवडून येऊ द्या, मुख्यमंत्र्यांचा गणपतीच करू”; कडूंनी थेट इशाराच दिला

Bacchu Kadu : राज्याच्या राजकारणात आता फक्त विधानसभा निवडणुकांचीच(Maharashtra Elections) चर्चा सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकारणात तिसरी आघाडी उदयास आली आहे. या आघाडीतील नेत्यांनी आता थेट महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना इशारे देण्यास सुरुवात केली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनीही (Bacchu kadu) नुकतेच एक वक्तव्य केले आहे. ज्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 288 आमदार नाही फक्त 10 आमदार जरी निवडून आले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला.

कडू पुढे म्हणाले, आताची निवडणूक सोपी नाही. पैशांचा प्रचंड केला जाणार आहे. पण ज्यावेळी सर्वसामान्य माणूस पेटून उठतो त्यावेळी माझ्यासारखे चार आमदार निवडून येतात. तुमच्यासमोर कधी कोण उमेदवारांची यादी जाहीर करतो का, ह्यांच्या याद्या दिल्ली आणि मुंबईतून फायनल होतात. सगळा पैशांचा खेळ असतो. सामान्य माणसांनीच मला चार वेळा निवडून दिलं आताही आपल्याला सामान्य माणसालाच निवडून द्यायचं आहे असे बच्चू कडू म्हणाले.

Bacchu Kadu : निधी कमी दिला तर तिथं येऊन वांदा करेन.. बच्चू कडूंची अधिकाऱ्यांना तंबी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad Pawar) तिसऱ्या आघाडीवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आज बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांच्यात दम राहिलेला नाही. त्यांना असं वाटत असेल की आम्ही आल्याने त्यांचं नुकसान होत असेल यावरून तुमची कुवत काय आहे हे लक्षात येते. त्यांची कुवतच नाही. इतक्या मोठ्या ताकदीने मतदान मिळाल्यानंतरही तुम्ही केंद्रात सत्ता आणू शकले नाहीत, असा खोचक टोला त्यांनी शरद पवारांना लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube