…अखेर राहुल गांधींनी सरकारी बंगला सोडला; नव्या ठिकाणी मुक्काम हलवला

  • Written By: Published:
…अखेर राहुल गांधींनी सरकारी बंगला सोडला; नव्या ठिकाणी मुक्काम हलवला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज आपला सरकारी बंगला सोडला आहे. कालपर्यंत त्यांनी सरकारी बंगल्यातील सर्व सामान रिकामे केले होते आणि त्यांनी संपूर्ण बंगला खाली केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीतील 12, तुघलक लेन हा सरकारी बंगला आज राहुल गांधी यांनी लोकसभा सचिवालयाकडे सोपवला.

राहुल गांधी यांना दिलेल्या मुदतीनुसार आजच बंगला रिकामा करण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे आज संपूर्ण सामान हलवून स्वत: राहुल गांधी संबंधित मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चाव्या सोपविल्या असल्याचं बोललं गेलं.

Mamata Banerjee : जीव देईल पण देशाची फाळणी होऊ देणार नाही!

मोदी आडनावावर टीका केल्यामुळे राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यामुळे त्यांना 22 एप्रिलपर्यंत सरकारी बंगला खाली करण्यास सांगण्यात आले होते.

मिडिया रिपोर्टनुसार १४ एप्रिल रोजी राहुल गांधी यांनी त्यांचे कार्यालय आणि काही वैयक्तिक सामान सरकारी निवासस्थानातून त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्या अधिकृत निवासस्थानी हलवले होते. यानंतर जे काही सामान उरले होते, तेही आज त्यांनी हलवले आहे. शुक्रवारपर्यंत घर पूर्णपणे रिकामे झाले आहे. तर आज त्यांनी सरकारी अधिकाऱ्याकडे घराची चावी सोपविली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना बाप मानले…आमदार शिरसाटांचा हल्लाबोल

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube