काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पेपरफुटीच्या मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर जोरदार आगपाखड केली. त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना थेट आकडेवारी सांगत प्रत्युत्तर दिले.
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.
बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने दगडफेक करुन तोडले होते.
मंत्री मोहोळ यांच्याकडे नागरी हवाई वाहतूक विभागाची जबाबदारी आल्यानंतर पहिल्याच दिवसापासून त्यांनी पुणे विमानतळाच्या प्रश्नांबाबत विशेष लक्ष घातले.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात काल (दि.28) अजित पवारांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यात अनेक योजनांची खैरात करण्यात आली आहे.
लाडकी बहीण ही योजना काल लागू करण्यात आली. शेतकरी, वारकरी आणि तरुणांसाठीही सरकारने योजना लागू केल्या आहेत.
रिल्ससाठी जगभरात लोकप्रिय असणारे इन्टाग्राम प्लॅटफॉर्म डाऊन झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जगभरीतल करोडो इन्टा यूजर्सना अडचणींचा समाना कराव लागत आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून दहा जणांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ यांच्यासह अनेकांची नावे आहेत.
दौलत बेग ओल्डी येथे लष्करी सराव सुरू असताना मोठा अपघात झाला. नदी ओलांडताना ५ जवान शहीद झाले आहेत.
पाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहेत. टीम इंडियाने गेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.