मुंबई : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. लंडनमधील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. स्वत: ललित मोदी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत माहिती दिली आहे. तसंच त्यांना पुढील उपचारासाठी लंडनला एअरलिफ्ट करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं असून त्याचेही फोटो पोस्ट […]
पुणे : प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले. राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण त्यांनी केले. महाराष्ट्र […]
मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘पठाण’ सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पठाण’चा ट्रेलर नुकताच आऊट झाला आहे. किंग खान सध्या ‘पठाण’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरुखने ‘इंटरनॅशनल लीग टी 20’साठी दुबईच्या स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे. आज या सिनेमाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकणार आहे. Brace yourselves for a visual spectacle – catch #PathaanTrailer […]
नवी दिल्ली : लोकसभा सचिवालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खासदाराचे सदस्तत्व रद्द केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेतील सदस्य संख्या एकाने कमी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यासंदर्भातील अधिसूचनाही काढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना अपात्र ठरवले आहे. फैजल यांना न्यायालयाने हत्येचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात दोषी […]
मुंबई : नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांनी फॉर्म भरल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत एका पाठोपाठ एक ट्विस्ट समोर येत आहेत. अशातच अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी मुंबई गाठली असून त्या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या […]
पुणे : काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले होते. यावरुन चंद्रकांत पाटील यांना माफी देखील मागावी लागली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आपला कुठलाच देव बॅचलर नाही, महापुरूषही बॅचलर नाही असं वक्तव्य चंद्रकांत […]
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवरुन मोठा ड्रामा पाहायला मिळाला. शेवटच्या दिवशी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या मुलगा सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर भाजपने सत्यजित तांबे यांना अप्रत्यक्षपणे जाहीर पाठिंबा दिलाय. सत्यजित तांबेच्या उमेदवारीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, ‘योग्य वेळी योग्य निर्णय […]
नागपूर : कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणात सावनेरचे आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांना जिल्हा न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली. 2017 मध्ये महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयानं आज हा निर्णय दिला आहे. नागपूर […]
मुंबई : ज्येष्ठ लेखक आणि मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर त्यांची मराठी भाषा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेतली. दीक्षित यांनी राजीनामा देताना भाषा आणि वित्त विभागाच्या कारभारावर टीका केली आहे. करमणूकप्रधान, उत्सवी पद्धतीच्या उपक्रमांवर उधळपट्टी कशासाठी? अशी विचारणा दीक्षित यांनी केली आहे. भाषा […]
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. यादरम्यान 66 दिवसांत 27 बैठका होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. दरम्यान, 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असणारा आहे. प्रल्हाद जोशी म्हणाले, संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2022 ते 29 डिसेंबर 2022 या […]