गुवाहाटी : टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने नववर्षाची शानदार सुरुवात केली आहे. विराटने कोहलीने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खणखणीत शतक ठोकलंय. कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताला श्रीलंकेपुढे पहिल्या वनडे सामन्यात ३७४ धावांचे आव्हान ठेवता आले. विराट कोहलीने यावेळी ८७ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ११३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. श्रीलंकेने नाणेफेक […]
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी दिवसेदिवस वाढत आहेत. ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली. यावर शिवसेना ठाकरे गट नेते अरविंद सावंत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गट आणि भाजपकडून ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे. अरविंद सावंत म्हणाले की, […]
मुंबई: ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपट प्रचारकी असल्याची देखील टीका झाली होती. मात्र, ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलंय. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला प्रतिष्ठित ऑस्कर 2023 पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलं गेलंय, अशी माहिती ट्विट करत सांगितली आहे. भारतातून ऑस्करसाठी पाठवलेल्या पाच चित्रपटांपैकी हा […]
IND vs SL IND vs SL 1st ODI Score Live Update
कोल्हापूर : महाराष्ट्रासह कर्नाटकात झालेल्या विचारवंतांच्या हत्येमुळे सारा देश हादरला होता. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यासारख्या विचारवंताच्या हत्या झाल्या होत्या. यातील ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील १० आरोपींवर दोष निश्चिती करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हा न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयासमोर सोमवारी ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी […]
अहमदनगर : जिल्ह्यासह मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दोन दिवस थंडीची लाट राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. उत्तर भारतातील थंडीची लाट पाहता भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व पुणे जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात […]
अहमदनगर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करा अशी मागणी विधानपरिषदेत केली होती. या मागणीवर अहमदनगर जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगर जिल्ह्याचे आधी विभाजन करा व त्यानंतर नामांतर करा अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार राम शिंदे यांनी आपली […]
नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येतो. या आरोपांना गौतम अदानींनी एका टीव्ही मुलाखतीत उत्तरे दिली. काँग्रेसच्या राजीव गांधी सरकारच्या काळात आमचा व्यवसाय वाढू लागला होता आणि आज तो २२ राज्यांमध्ये पसरला आहे, त्या सर्व राज्यांमध्ये काही भाजपाची सत्ता नाही, गौतम अदानी […]
नाशिक : बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरवात केली आहे. याच धर्तीवर बिहार प्रमाणे महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत त्यांनी राज्य सरकारला पत्र दिले आहे. छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, नुकतीच बिहारमध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. […]
मुंबई : सुनील तटकरे आणि माझा आतापर्यंतचा प्रवास सारखाच राहिलाय. आमचा पाठशिवणीचा खेळ आहे. पण आजच्या घडीला व्यासपीठावरचं चित्र बघितलं तर दिल्लीत जाण्याचा रस्ता बंद दिसतोय, अशी टोलेबाजी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सुनील तटकरेंच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात केली. भास्कर जाधव यांनी दिल्लीवारीची इच्छा व्यक्त केल्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे यांनीही जाधवांना खासदारकी लढवण्याची ऑफर […]