कोहलीचं 73 वे ‘विराट’ शतक, श्रीलंकेला विजयासाठी 374 धावांचे आव्हान
गुवाहाटी : टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने नववर्षाची शानदार सुरुवात केली आहे. विराटने कोहलीने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खणखणीत शतक ठोकलंय.
कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताला श्रीलंकेपुढे पहिल्या वनडे सामन्यात ३७४ धावांचे आव्हान ठेवता आले. विराट कोहलीने यावेळी ८७ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ११३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. रोहित आणि गिल या दोघांनी आपली अर्धशतके झळकावली. गिलने ६० चेंडूंत ११ चौकारांच्या जोरावर ७० धावांची दमदार खेळी साकारली. गिल आणि रोहित यांनी यावेळी १४३ धावांची सलामी दिली.
रोहितने ६७ चेंडूंत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ८३ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. रोहित बाद झाल्यावर कोहलीने भारताची बाजू चांगलीच सावरली. कारण एका बाजूने श्रेयस अय्यर (२८) लोकेश राहुल (३९) आणि हार्दिक पंड्या (१४) यांना मोठी खेळी साकारता आली नाही.