संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. यादरम्यान 66 दिवसांत 27 बैठका होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

दरम्यान, 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असणारा आहे. प्रल्हाद जोशी म्हणाले, संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2022 ते 29 डिसेंबर 2022 या कालावधीत चालणार होते, परंतु नंतर सभागृहात गदारोळ झाल्याने ते थांबवण्यात आले होते.

केंद्रीय मंत्री म्हणाले, “संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, 31 जानेवारीपासून सुरू होईल आणि 6 एप्रिलपर्यंत चालेल, 66 दिवसांत 27 बैठका सामान्य सुट्टीसह असतील.” राष्ट्रपतींचे अभिभाषण, केंद्रीय अर्थसंकल्प आणि अमृत कालमधील इतर बाबींवर आभार प्रस्तावावर चर्चेची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ झाला होता. तवांगच्या मुद्द्यावरून 17 विरोधी पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही याप्रकरणी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती.

यासोबतच खरगे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वादग्रस्त वक्तव्यावरून संसदेत चांगलाच गदारोळ झाला. यामुळेच संसदेचे हिवाळी अधिवेशन मुदतीपूर्वीच संपुष्टात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube