रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. मात्र, या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना तात्काळ 2,000 रुपयांच्या नोटा ग्राहकांना न देण्याचे आदेश दिले आहेत. आरबीआयने म्हटले आहे की या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत कायदेशीर रित्या चलनात राहतील. म्हणजेच सध्या ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा […]
Sameer Wankhede :अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर चर्चेत आलेले एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने 22 मे पर्यंत कोणतीही कठोर कारवाई आणि अटक करण्यास स्थगिती दिली आहे. वास्तविक, सीबीआयने वानखेडे यांना 18 मे रोजी म्हणजेच गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते. अटकेच्या भीतीने […]
IPL 2023: आयपीएलच्या 16 व्या हंगामात आतापर्यंत चेन्नईची सर्वाधिक चर्चा झाली आहे. महेंद्रसिंग धोनीवर चाहत्यांच्या प्रेमाचा अंदाज यावरून लावता येतो की चेन्नईचा संघ जिथे जिथे खेळायला गेला तिथे संपूर्ण स्टेडियममध्ये फक्त पिवळी जर्सीच दिसत होती. चेन्नई सुपर किंग्जचा जलवा टीव्हीवर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामने प्रसारित करताना दिसून आला आहे. या मोसमातील 57 लीग सामन्यांनंतर, टीव्हीवरील […]
सध्याच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीला शतक ठोकण्यात यश आले. आयपीएलमध्ये त्याच्या बॅटने हे शतक 1489 दिवसांनंतर आले आहे. त्याने शेवटचे शतक 19 एप्रिल 2019 रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध ईडन गार्डन्सवर केले आणि आता 18 मे 2023 रोजी, विराटने हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध शतक केले. आयपीएलच्या 63 डावांनंतर त्याचे शतक झाले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील […]
लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने (ATC) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दोन प्रकरणांमध्ये 2 जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे. जिन्ना हाऊस तोडफोड प्रकरणात आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) कार्यकर्ते जिल्ले शाह हत्या प्रकरणात इम्रान खानला जामीन मिळाला आहे. इम्रान खान यांनी त्यांचे वकील, बॅरिस्टर सलमान सफदर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती आणि जिल्ले शाह खून प्रकरणात त्यांच्याविरुद्ध […]
मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु पक्षातील नेत्यांच्या आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. आता शरद पवार हे पुन्हा ॲक्टिव झाल्याने अनेकांच्या अडचणीत वाढ झाल्याचा टोला जयंत पाटील यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे. येत्या काळात देशासह राज्यात देखील निवडणुका होऊ […]
राज्याच्या राजकारणातील नेहमी एकमेकांच्या विरोधात उभे असणारे मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंडे बहीण भाऊ यांच्यातील कटुता आता दूर होत आहे. ते एकमेकांना मदार करताना दिसत आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय संघर्ष टाळत समन्वयाने काम करण्याचा निर्णय पंकजा आणि धनंजय मुंडे या दोघांनीही घेतल्याची चर्चा आहे. बाजारसमितीच्या निवडणुकीत एकमेकांसमोर […]
IPL च्या शेवटच्या सत्रात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. या सामन्यात RCB ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी फाफ डू प्लेसिसचा कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. […]
राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आवश्यक आहे. कोणी नाराज होऊ नये म्हणून जर मंत्रिमंडळाचा विस्तार सरकाने थांबवला असेल तर हे चुकीचं आहे. यावेळी आमदार आमदार बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत म्हंटले की जर एखाद्या मंत्र्याकडे आठ-आठ खाती आणि आठ-आठ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद असेल तर हे चुकीचं आहे. आज ते अमरावतीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. शिंदे […]