मुंडे बहिण भाऊ एकत्र, वैद्यनाथ कारखाना निवडणूक बिनविरोध होणार..

  • Written By: Published:
मुंडे बहिण भाऊ एकत्र, वैद्यनाथ कारखाना निवडणूक बिनविरोध होणार..

राज्याच्या राजकारणातील नेहमी एकमेकांच्या विरोधात उभे असणारे मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंडे बहीण भाऊ यांच्यातील कटुता आता दूर होत आहे. ते एकमेकांना मदार करताना दिसत आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय संघर्ष टाळत समन्वयाने काम करण्याचा निर्णय पंकजा आणि धनंजय मुंडे या दोघांनीही घेतल्याची चर्चा आहे.

बाजारसमितीच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे टाकलेले मुंडे बहीण भाऊ आता वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुकीत जवळ येत आहेत. या आगोदर देखील जवाहर शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत हे बहीण भाऊ एकत्र आले होते. आता पुन्हा एकदा वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुकीत कटुता दूर करून कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय मुंडे बहीण भावांनी घेतला आहे.

एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले मुंडे बहीण भाऊ यांची दिलजमाई ही बीड जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाची गोष्ट ठरणार आहे. मुंडे बहीण भाऊ एकत्र येणार असल्याचे संकेत पुणे येथे भाजप प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत दिले.

निवडणुका घेऊन एकदाचा सोक्ष-मोक्ष लावा, जयंत पाटलांचं खुलं आव्हान

या आगोदर जेव्हा मुंडे बहीण भाऊ भगवान गडावर एका कार्यक्रमा निमित्त एकत्र आले होते. तेव्हा त्यांच्या भाषणातून असे दिसून आले होते की आता हे एकत्र येऊ शकतात. तशी त्यांच्या त्या भाषणाची चर्चा देखील राज्यभरात खूप झाली होती.

वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुकीपासून त्याला सुरूवात झाली असेच म्हणावे लागेल. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी झाली. यात 50 पैकी 13 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. यात नाथरा गटातून पंकजा मुंडे यांचा देखील समावेश आहे. परंतु त्यांचा महिला गटातील दुसरा अर्ज वैध ठरला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube