नवं मंत्रिमंडळ स्थापनेची लगबग; महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू, PHOTO

- Mahayuti CM Of Maharashtra : राज्यात महायुती पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. यासाठी महायुतीचे नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत.
- यावेळी अजित पवार यांनी महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच अजित पवार यांनी अगोदरच मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं जाहीर केलंय.
- आज कराड येथे प्रितीसंगम बागेत राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळाचे दर्शन अजित पवार यांनी घेतले. पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
- राज्यात नवं मंत्रिमंडळ स्थापनेची लगबग आहे. आज महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत.
- देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीसांनी विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केलंय.
- भाजपने यंदा राज्यात सर्वात जास्ता जागा मिळवल्या आहेत. फडणवीसांनी जिलेबी बनवून जल्लोष साजरा केलाय.