नवी दिल्ली : इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. काउंटी चॅम्पियनशिपच्या या मोसमात तो ससेक्सचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. गेल्या वर्षी त्याने इंग्लिश कौंटीमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याची कामगिरी पाहून ससेक्सने पुजाराला कर्णधार बनवले आहे. खुद्द चेतेश्वर पुजाराने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून […]
नागपूर : माझ्या माहितीनुसार 16 तारखेला राहुल गांधी उपलब्ध होते. परंतु मुदामून त्यांची वेगळी वेळ घेतली महाराष्ट्रात जी महाविकास आघाडीची वज्रमूठ होत आहे. तिला सैल आणि महाविकास आघाडीला तोडण्याचं काम नाना पटोले करत आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. ते आज नागपुरात ABP माझाशी बोलत होते. मागच्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरला […]
नवी दिल्ली : ऑनलाइन गेमिंगशी संबंधित नवीन नियम गुरुवारी जारी करत सरकारने बेटिंग आणि सट्टेबाजीशी संबंधित कोणत्याही गेमवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सट्टेबाजी आणि जुगाराच्या जाहिरातींविरूद्ध एक नवीन नियम जारी केला आहे. यामध्ये, मीडियाला सट्टेबाजीच्या प्लॅटफॉर्मचा प्रचार करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. भारतीय कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या बेटिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा […]
पुणे : जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील बगाड यात्रा सुरु असताना बगाड मधोमध तुटल्याने अपघात झाला आहे. उंचावरून जमीनीवर पडल्याने एक जण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी आहे. सुनील चिलप व संदीप चिलप बगाड हे दोघे या बगाडाला लटकलेले दरम्यान मिरवणूक पारुंडे येथील चौकात आल्यावर बगाड मध्यभागी तुटले आणि दोघेही जमिनीवर उंचावरून जोरदार आपटले. रोशनी […]
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात पाच हजारांहून अधिक म्हणजेच 5,335 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. हा आकडा गेल्या 195 दिवसांतील उच्चांक आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 23 सप्टेंबर रोजी 5,383 प्रकरणे नोंदवली गेली होती. यासह, देशातील सक्रिय रुग्णाची संख्या 25,587 झाली आहे. यादरम्यान 13 जणांना […]
नवी दिल्ली : लीग 2023 सुरू होऊन आठ दिवस झाले आहे. या मोसमात आतापर्यंत 8 सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा देशात डोकेवर काढले आहे. कोविड-19 देशाच्या अनेक भागात पसरत आहे. दिल्लीसह अनेक ठिकाणी त्याची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. हे लक्षात घेऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंसाठी नियमावली जारी केली आहे. […]
ठाणे : कॉंग्रेसची ठाण्यात गेलेली पत परत मिळविण्यासाठी कॉंग्रेस पुन्हा एकदा ठाण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. काँग्रेसच्या या खेळीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढणार आहे. काँग्रेसच्या आगोदर ठाण्यात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे कॉंग्रेस देखील आता ठाण्याच्या मैदानात उतरली आहे. काँग्रेसने आता ठाण्याकडे पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार […]
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी पाकिस्तानने संघाची घोषणा केली आहे. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती आणि ते आता परतले आहेत. शाहीन आफ्रिदीही चार महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. शाहीन आफ्रिदीला गेल्या वर्षी जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या गाले कसोटीत गुडघ्याला दुखापत झाली […]
अहमदनगर : तालुका स्तरावरील नायब तहसिलदार पद हे अतिशय महत्वाचे असून, त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे.या प्रश्नांबाबत लवकरच बैठक घेवून दिलासादायक निर्णय करण्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राज्यातील सर्व तहसिलदार आणि नायब तहसिलदार आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. संघटनेचे प्रतिनिधी या नात्याने शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद […]