मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांत कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण, खा. संजय राऊत यासारख्या अनेक नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं म्हणतं विरोधकांनी गृहमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. अशातच आता खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा एकदा […]
मुंबई : नेहमीच तिच्या हॉट आणि बिंधास्त लुकमुळे सोशल मिडीयावर तूफान आणणारी उर्फी जावेदने एक ट्विट करत नेटकऱ्यांना धक्का दिला आहे. उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे नेहमीच बातम्यांमध्ये झळकते. त्याचबरोबर तिच्या याच कपड्यांमुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका आणि वाद देखील निर्माण झाल्याचं अनेकदा पाहायला मिळत. गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये […]
मुंबई : महाविकास आघाडीच्या काळात जी विकासकाम सुरू होती. त्या कामांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याने महाविकास आघाडीचे काही आमदार हे हायकोर्टात गेलेले आहेत. त्यांनी त्याविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये कॉंग्रेस आमदार संजय जगताप यांचा देखील समावेश आहे. त्यांनी यावेळी सांगितले की, त्यांच्या मतदारसंघातील मंजूर झालेल्या विकास कामांना स्थगिती देण्यात आली आहे. तसेच त्यामागील कारणं […]
Small Saving Rate Hike: उद्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. त्यापूर्वीच सरकारकडून छोट्या बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारने खूशखबर दिली आहे. सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग स्किम, किसान विकास पत्र, पोस्टाच्या बचत योजना आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेतील व्याजदर वाढले आहे. आर्थिक वर्षातील एप्रिल आणि जूनच्या बचत योजनेवरील व्याजदर 10 ते 70 बेसिक पाँइटने […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देश आणि राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. कॉंग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यानंतर राज्य आणि देशात भाजपकडून आंदोलने केली गेली. तसेच अनेक पक्षांकडूनही कधी सावरकरांच्या मुद्द्याच्या बाजूने तर कधी विरोधात भुमिका घेतल्याचं पाहायला मिळलं. त्यादरम्यान आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या […]
मुंबई : आज चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्री मीना कुमारी यांची पुण्यतिथी आहे. मीना कुमारी यांना जाऊन आज 51 वर्ष झाले. पण आजही त्यांच्या चित्रपटांची चर्चा कुठे ना कुठे सुरूच असते. त्याकाळी मीना कुमारी चित्रपटांच्या हिरॉईन नाही तर हिरोच असायच्या. त्यामुळे अभिनेते त्यांच्यासोबत चित्रपट करण्यास घाबरत की, मीना कुमारींमुळे आपली भूमिका फिकी ना वाटो. मीना कुमारी […]
पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर लगेचच कॉंग्रेसने पोटनिवडणुकीविषयी बोलणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असल्याची टीका भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी केली आहे. तर वडेट्टीवारांसारख्या नेत्याने हे बोलणं अत्यंत निंदनीय असल्याचं काकडे म्हणाले कारण ते गिरीश बापट यांच्यासोबत अनेक वर्ष सभागृहात एकत्र होते.आपल्या सहकाऱ्याच्या जाण्यनंतर लगेच पोट निवडणुकांबद्दल बोलणे योग्य नाही. यावेळी […]
नाशिक : गुरूवारी देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी या उत्सवाला दालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. तर त्याचवेळी नाशिकमध्ये काळाराम मंदीरामध्ये मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोल्हापूरच्या गादीचे वंशज आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांच्याबाबतीत एक अनुचित प्रकार घडल्याचं पाहायला मिळाला. याबद्दल स्वतः संयोगीताराजे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट […]
अहमदनगर : सुषमा अंधारेंसारख्या राजकारणातील सक्रिय महिलेला जर आपली तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशमध्ये तासन् तास वाट पाहावी लागली. पोलीस तक्रार घेत नाहीत म्हणून महिला आयोगाकडे धाव घ्यावी लागली हे दुर्देव आहे. ही राज्याच्या गृहविभागाची जबाबदारी आहे. अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. त्या अहमदनगरमध्ये बोलत होत्या. त्याचबरोबर पुढे चाकणकर असं […]
मुंबई : मुंबई हायकोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का दिला आहे. मुंबई हायकोर्टाने आमदार निधीच्या वाटपाला स्थगिती दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून आमदार निधी वाटपाबाबात घाई केली जात आहे. याबाबत आता मुंबई हायकोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आमदार निधीच्या वाटपाला स्थगिती दिली आहे. राज्यात विकास निधी वाटपाच्या याचिका प्रलंबित असल्याने मुंबई हायकोर्टाने हे […]