Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : श्रीरामांच्या त्रेता युगाची आठवण करून देणारं अयोध्या स्टेशन!
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येमध्ये एकीकडे भव्य अशा प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे निर्माण (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) झाल्यानंतर दुसरीकडे भाविकांना अयोध्येमध्ये पोहोचण्यासाठी आधुनिक मात्र पारंपारिकतेचा टच असणाऱ्या आयोध्या स्टेशन यासह अयोध्या एअरपोर्टची निर्मिती करण्यात आली आहे. या दोन्हीही ठिकाणी शनिवारी 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे पाहूयात राम मंदिराप्रमाणेच भव्य असणार अयोध्या स्टेशन कसं आहे…
आयोध्या रेल्वे स्टेशन हे नागरशैली या बांधकाम पद्धतीने श्रीराम मंदिराची प्रेरणा घेऊन विकसित करण्यात आले असून प्रभू श्रीरामांच्या मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरच हे स्टेशन निर्माण करण्यात आले 2022 मध्येच या स्टेशनचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला होता. लखनऊ मधील अग्रवाल परिवाराने यासाठी कष्ट घेतले आहेत. पारंपारिक ते बरोबरच या स्टेशनवरती पर्यावरणाला अनुकूल असणाऱ्या आधुनिक गोष्टी देखील तयार करण्यात आल्या आहेत.
सन उत्सवांच्या काळात तब्बल साठ हजार भाविक स्टेशनवरून ये जा करू शकतील एवढी क्षमता या प्लॅटफॉर्मची आहे. स्टेशनच्या बांधकामाबद्दल बोलायचं झालं तर तब्बल अकरा हजार चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये पसरलेला स्टेशनच्या इमारतीचा मध्यवर्ती घुमट हा श्रीरामांच्या मुकुटाप्रमाणे बनवण्यात आलाय. त्यामागे सूर्याप्रमाणे चक्र देखील निर्माण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या दोन मजली इमारतीवरील दोन शिखर ही माता सीतेच्या मंदिराच्या शिखरा प्रमाणे बनवण्यात आले आहेत.
Ram Mandir : आडवाणींनी रथयात्रा काढली अन् राम मंदिरानिर्माणची लाट पसरली…
त्याचबरोबर या ठिकाणी विजेची जास्तीत जास्त बचत करण्यासाठी स्टेशनचे डिझाईन असे तयार करण्यात आला आहे जेणेकरून दिवसभरात या ठिकाणी नैसर्गिक प्रकाश राहील. पाण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग देखील करण्यात येणार आहे. तर सांडपाण्यावर प्रक्रिया करून या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या बगीच्यासाठी ते पाणी वापरण्यात येणार आहे. तर मुख्य आयोध्या जंक्शन टर्मिनलला हायवे आणि मंदिराला जोडणारी अरुंद लेन आता हेरिटेज रोड बनणार आहे. ज्यामध्ये भूमिगत वीज, टेलिफोन केबल्स या आधुनिक सुविधा त्याचबरोबर दर्शनी भाग त्रेता युगाची आठवण करून देणारा असेल. तर स्टेशनचा छताचा भाग हा कमळाच्या पाकळ्याप्रमाणे असून या स्टेशनच्या सध्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे.
VIDEO: कडक मराठीवरील गावरान मेवाचे ‘दाजी’ आलेत ! नवीन भाग बघा…
तर प्रवाशांसाठी या ठिकाणी मोठे मोठे वेटिंग एरिया आणि पार्किंग निर्माण करण्यात आले. त्यामुळे स्टेशनची क्षमता एक लाखांहून अधिक प्रवाशांची होणार आहे. या प्रोजेक्टला जवळपास तब्बल 430 कोटी रुपयांचा खर्च आल्याचे सांगण्यात येते. तर शनिवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते या आयोध्या जंक्शनचं उद्घाटन होणार असून याचवेळी सहा वंदे भारत आणि दोन अमृत भारत एक्सप्रेस यासह आठ रेल्वेचा देखील शुभारंभ होणार आहे.