स्टार परिवारची 25 वर्षे! 25 अद्भुत माता आणि अनुपमाचा अविस्मरणीय डान्स

स्टार परिवार 2025 च्या माध्यमातून स्टार प्लसने आपल्या मालिका आणि त्यातील कलाकार यांचा गौरव केला.

Entertainment News (44)

Star Parivar Anniversary : स्टार प्लसने भारतीय टेलिव्हिजनवरील एक अत्यंत मोठी GEC वाहिनी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे आणि उत्तमोत्तम मालिका सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांसाठी मालिका आणि आनंद घेऊन येण्याचे हे या वाहिनीचे 25 वे वर्ष आहे. आणि दर वर्षीप्रमाणे, स्टार परिवार 2025 च्या माध्यमातून स्टार प्लसने आपल्या मालिका आणि त्यातील कलाकार यांचा गौरव केला.

भव्य सोहळा…

25 व्या वर्धापन दिनाचा (Star Parivar Anniversary) हा भव्य सोहळा चमकदार परफॉर्मन्सेस, धमाल आणि हृदयस्पर्शी रियुनियन यांनी नटला होता. स्टार प्लसवरील दिग्गज कलाकारांनी आपल्या संस्मरणीय अॅक्टद्वारे मंच उजळून टाकला. रूपाली गांगुलीने 25 विशेष मातांसोबत केलेला खास अॅक्ट या कार्यक्रमात उठून दिसला. हा अॅक्ट खास होता कारण यातील प्रत्येक स्त्रीने आपल्या जीवनात संघर्ष केला होता, स्वप्ने, कुटुंब आणि वैयक्तिक आव्हाने यांच्यात समतोल साधला होता आणि रुपालीने पडद्यावर साकारलेल्या अनुपमाच्या व्यक्तिरेखेतून प्रेरणा घेतली होती. यापैकी काही (Star Plus) प्रेरणादायक माता आहेत- निकिता जोशी, एक कथ्थक डान्सर, जिने पुन्हा नव्याने आपला डान्सचा छंद जोपासला आणि त्यात नवीन सिद्धी प्राप्त केल्या. दीपाली सारस, एक विवाहित तरुणी, जिने आपल्या पतीच्या प्रोत्साहनाने आणि अनुपमाकडून प्रेरणा मिळवून डान्सबद्दलचे प्रेम जोपासले आणि आपल्या डान्स रील्समुळे ती सोशल मीडिया सेन्सेशन बनली. पूर्ती कोठारीने टीव्हीवर परफॉर्म करण्याचे स्वप्न पाहिले, तर आकांक्षा देसाई (Rupali Ganguly ) या सिंगल मदर, डान्स उद्योजिकेने तीन स्टुडिओ व एक सिल्व्हर बटन-विजेता यूट्यूब चॅनल चालवले, चिकाटी आणि सर्जनशीलतेने आपले जीवन पुन्हा उभे केले. श्रद्धा शाह, शारीरिक दृष्ट्या विकलांग आणि ऑटिस्टिक मुलांसाठीची डान्स थेरपिस्ट, जी कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती आहे. ती खूपशी अनुपमासारखी दिसते असे अनेक जण म्हणतात. यांच्याव्यतिरिक्त इतर 20 मातांनी देखील अनुपमा सोबत या अवॉर्ड्स रजनीमध्ये परफॉर्म केले.

चिकाटीला मिळालेली दाद

या मातांसाठी रुपाली सोबत मंच शेअर करणे हे परफॉर्म करण्यापेक्षा अधिक होते. त्यांचे स्वप्न जणू साकार झाले होते. त्यांच्या चिकाटीला मिळालेली ही दाद होती. या अॅक्टमध्ये अनुपमाचे प्रेक्षकांशी असलेले सखोल नाते तसेच अनुपमामुळे लोकांना मिळणारी प्रेरणा यांना हायलाइट करण्यात आले आणि अनुपमाप्रमाणे आव्हानांचे आकांक्षांमध्ये रूपांतर करणाऱ्या स्त्रियांचा सत्कार करण्यात आला. स्टार प्लसच्या कथा कथनाच्या उत्कृष्टतेची 25 वर्षे साजरी करणारी ही एक हृदयस्पर्शी आदरांजली होती.

अविस्मरणीय क्षणांनी भरलेला सोहळा

स्टार परिवार अवॉर्ड्स 2025 एक नेत्रदीपक सेलिब्रेशन असणार आहे, ज्यामध्ये मंत्रमुग्ध करणारे परफॉर्मन्स, हृदयस्पर्शी रियुनियन आणि स्टार प्लसच्या मोठमोठ्या कलाकारांची ग्लॅमरस उपस्थिती असेल. प्रेक्षकांसाठी ही रोमांच, सुंदर आठवणी आणि मनोरंजनाने परिपूर्ण रजनी असेल. यामध्ये त्यांच्या आवडत्या व्यक्तिरेखा आणि वेगवेगळ्या काळातील कलाकार एकत्र येऊन स्टार प्लसच्या लक्षणीय प्रवासाला सलामी देतील. अविस्मरणीय क्षणांनी भरलेला हा पुरस्कार सोहळा नक्कीच स्टार प्लसच्या चिरंतन वारशाला दिलेली सलामी आहे, त्यामुळे देशभरातील लोकांनी अवश्य बघावा असाच हा सोहळा असेल.

बघा, स्टार परिवार अवॉर्ड्स 2025, रविवार, 12 ऑक्टोबर रोजी रात्री 7 वाजता फक्त स्टार प्लसवर

follow us