काँग्रसच्या वोट चोरी मोहिमेत माझा संबंध नाही; ‘त्या’ व्हिडिओवरून अभिनेता के. के. मेनन भडकला

Actor K. K. Menon on vote Chori : ज्यामध्ये ‘स्पेशल ऑप्स’ या वेब सीरिजमध्ये (vote Chori) हिम्मत सिंगची भूमिका साकारलेला अभिनेता के. के. मेनन ‘वोट चोरी’ मोहिमेचा प्रचार करताना दिसला. हा व्हिडिओ काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओबाबत त्याने आता राग व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या या मोहिमेचा भाग नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे. हा व्हिडीओ माझ्या परवानगीशिवाय वापरण्यात आला आहे, असंही त्याने म्हटलंय.
थांबा, थांबा.. स्क्रोल करणं थांबवा. जर तुम्ही ही रील पाहत असाल तर त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? यानंतर व्हिडीओमध्ये आणखी एक व्यक्ती दिसत आहे, जो वोट चोरीविरुद्धच्या मोहिमेत सहभागी होण्याबद्दल बोलताना दिसत आहे. यासोबतच कॅप्शनमध्ये असंही लिहिलं आहे की, हिम्मत सिंग काहीतरी बोलत आहेत, ते लगेच अंमलात आणा. या व्हिडीओद्वारे लोकांना मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा अभंग तुकाराम’ या दिवशी होणार महाराष्ट्रात प्रदर्शित
दरम्यान, कृपया लक्षात घ्या की मी या जाहिरातीत काम केलेलं नाही. माझ्या स्पेशल ऑप्स या वेब सीरिजची एक प्रमोशनल क्लिप एडिट करण्यात आली आहे. तसंच, ती माझ्या परवानगीशिवाय वापरली गेली आहे. मी कोणत्याही मोहिमेत सहभाग घेतला नाही. ही क्लिप वापरण्यापूर्वी काँग्रेसने परवानगीदेखील घेतली नव्हती. तसंच, या व्हिडीओमध्ये स्पेशल ऑप्सच्या दुसऱ्या सिझनचं थीम साँगसुद्धा वापरलं गेलंय असंही अभिनेता के. के. मेननने स्पष्ट केलंय
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. एक लाख मतांची चोरी केवळ एकाच लोकसभा मतदारसंघात झाल्याचा आरोप त्यांनी डेटा दाखवत केला. इतकंच नव्हे तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 40 लाखांहून अधिक मतं संशयाच्या घेऱ्यात आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. वोट चोरीचा हा आरोप करत काँग्रेसने त्याविरोधात मोहीम सुरू केली आहे.