Aani Baani Movie Review: विनोदाची रंजक अन् संवेदनशील ‘आणीबाणी’

Aani Baani Movie Review: विनोदाची रंजक अन् संवेदनशील ‘आणीबाणी’

दिगंबर जाधव
रेटिंग- 4 स्टार्स

Aani Baani movie Review: ‘आणिबाणी’ (Aani Baani) हा शब्द ऐकताच १९७६ चा कालखंडातील अनेकांच्या काळ्या आठवणी जागे होत असल्याचे या सिनेमात पाहायला मिळणार आहे. परंतु देशाच्या इतिहासाच्या पानावर रेखाटलेल्या या आणीबाणीवर आधारित एक रंजक आणि विनोदी पट रुपेरी पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न या हटक्या सिनेमामधून करण्यात आला आहे. (Marathi Movie) ‘दिनिशा फिल्म्स’ निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शक दिनेश जगताप (Director Dinesh Jagtap) यांनी अतिशय मनोरंजक पद्धतीने आणीबाणीचा काळ प्रेक्षकांसमोर मांडल्याचा प्रयत्न केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)


एक छोट्याश्या गावातील विवाहित जोडप्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात अचानकपणे आलेल्या आणीबाणीचा नेमका काय परिणाम होतो. यावर हा संपूर्ण सिनेमा आधारित आहे. अभिनेता उपेंद्र लिमयेने (Actor Upendra Limaye) साकारलेली अभिमन्युची व्यक्तिरेखा चांगलीच रंगली आहे. त्याला तोडीस तोड वीणा जामकरची विमल ही व्यक्तिरेखा आहे. तसेच अनेक कॉमेडी सीन आणि संवाद त्यांनी उत्तम खुलवले आहेत. त्यांच्या संवादांना लाफ्टर येतोच. एवढेच नव्हे तर, संजय खापरे (Sanjay Khapare), प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी देखील आपापल्या व्यक्तिरेखेने या विनोदीपटामध्ये कॉमेडीची फोडणी टाकल्याचे बघायला मिळाले आहे.

तसेच सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी साकारलेला गावचा सरपंच देखील हास्याचे धुमारे उडवताना दिसत आहेत. हा सिनेमा सिनेमाच्या मध्यान्हात पुरुष नसबंदीचा विषय हाती घेतला जातो. अशावेळी मूल होण्याचे स्वप्न बाळगणारे आणि त्यासाठी प्रयत्न करत असणारे हे जोडपं कशापद्धतीने या पेचप्रसगामधून स्वतःला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात बघायला मिळालं आहे. हे या सिनेमात अतिशय रंजक पद्धतीने मांडल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या पहिला दिवस बॉक्स ऑफिसवर (box office) समाधानकरक अशी कामगिरी पाह्यला मिळाली आहे. कारण मुसळधार पावसामुळे पुण्यातील मराठी प्रेक्षक सिनेमागृहात किती गर्दी करतील याचा अंदाज घेता येत नाही.

Video : अन् अनिल कपूरच्या जर्मन चाहत्याने रस्त्यावर लावलं ‘राम लखन’ चं गाणं पाहा…

परंतु नाशिक किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये या सिनेमाला उत्तम ओपनिंग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या सिनेमाची आशययुक्त मांडणी, आणि सर्जनशील दिग्दर्शनाच्या सोबतीला हटक्या कलाकाराची फौज मराठी बॉक्स ऑफिसवर उतरलेला ‘आणीबाणी’ हा सिनेमा वन टाइम वॉच नक्कीच ठरणार आहे. या सिनेमात भरपुर मनोरंजनाचा आनंद तुम्हाला लुटता येणार आहे. कारण यात कॉमेडी, भावनिक सीन, नाती, भांडणं, गाणी, या सगळ्या गोष्टी आहेत. तेव्हा हा सिनेमा तुम्ही मित्रांसोबत नक्की एन्जॉय करणार आहात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube