महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

'Aanibaani: ‘चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता ‘प्रसारभारती’ च्या वेव्हज (waves) ओ.टी.टी. चॅनलवर हा चित्रपट.

  • Written By: Published:
'Aanibaani' OTT TV Based On Municipal Elections Battle

‘Aanibaani’ OTT TV based on municipal elections battle: मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होणार्‍या चित्रपट आणि वेब सिरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात असतात. वेगळे आशयविषय घेऊन आलेले मराठी चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित असतात. आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली हलकीफुलकी गोष्ट असलेला अरविंद जगताप लिखीत आणि दिनेश जगताप दिग्दर्शित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता ‘प्रसारभारती’ च्या वेव्हज (waves) ओ.टी.टी. चॅनलवर हा चित्रपट प्रेक्षकांना पहाता येणार आहे. (‘Aanibaani’ OTT TV based on municipal elections battle)

(https://www.wavespb.com/language)

हा चित्रपट 18 डिसेंबर 2025 रोजी ‘प्रसारभारती’ च्या वेव्हज (waves) ओ.टी.टी. चॅनलवर जगभरात प्रदर्शित झाला आहे. उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, (Upendra Limaye, Sayaji Shinde) प्रविण तरडे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, सुनील अभ्यंकर आदी कलाकारांच्या चित्रपटातील भूमिका लक्षवेधी आहेत.

एखाद्या सरकारी आदेशाची अंमलबजावणी करताना होणाऱ्या गोंधळाची, नवरा बायकोच्या प्रेमाची आणि त्यासोबत बापलेकाच्या नात्याची रंजक कथा लेखक अरविंद जगताप यांनी मिश्कीलपणे मांडली आहे. ही आणीबाणी कोणासाठी अडचणीची ठरणार ? आणि कोण यातून सहीसलामत बाहेर पडणार याची मनोरंजक कथा पहायला मिळणार आहे.

follow us