प्रसाद ओक साकारणार बाबुराव पेंटर! सोशल मिडिया पोस्ट करत सांगितलं…

प्रसाद ओक साकारणार बाबुराव पेंटर! सोशल मिडिया पोस्ट करत सांगितलं…

Prasad Oak will play Baburao Painter Role : मराठी सिनेमा विश्वात आजवर अनेक महान लोकांचे चरित्रपट होऊन (Marathi Movie) गेले. नव्या वर्षात अश्याच एका महान व्यक्तीची गोष्ट आपल्याला मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टी उभी केली जात आहे, त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यातलं एक महत्त्वपूर्ण नाव ‘बाबुराव पेंटर’ आहे. प्रसाद ओक (Prasad Oak) या चित्रपटात बाबुराव पेंटर यांची भूमिका साकारणार आहे.

मराठी सिनमांमध्ये हल्ली वैविध्यपूर्ण विषयांवरील चित्रपट होताना दिसतात. आता अश्या एका महान व्यक्तीवर चित्रपट होतोय. ही मराठी सिनेमा विश्वासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. ही भूमिका (Baburao Painter) साकारायला मिळणं, हा श्री नटराजाचा आशीर्वाद असल्याचं देखील प्रसादने म्हटलंय.

वाल्मिक कराडच्या समर्थकांची बैठक; धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, पुढं काय होणार ?

अभिनेता, दिग्दर्शक, लेखक प्रसाद ओक याने याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून याबद्दल माहिती दिली आहे. प्रसाद बाबुराव पेंटर यांची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. या भूमिकेबद्दल बोलताना प्रसाद सांगतो (Entertainment News) की, बाबुराव पेंटर यांच्या जीवनाराव आधारित भव्य कलाकृती निर्माण होत आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम त्यासाठी झटून काम करत आहेत. दिग्गज बाबुराव पेंटर यांची भूमिका मला साकारायला मिळणं, हा श्री नटराजा आणि गणपती बाप्पाचा मला मिळालेला आशीर्वाद आहे.

शिवसेना ठाकरे गटाची जवळजवळ काँग्रेस झाली; भास्कर जाधव यांचा उद्धव ठाकरेंना घरचा आहेर

आता या चित्रपटात अजून कोण कोण दिसणार? कधी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार? काय गोष्ट असणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 2025 वर्षात प्रसाद ओक अनेक चित्रपट करणार आहे. आता या चित्रपटासाठी देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

प्रसाद ओकने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ही बातमी शेअर केलीय. यात बाबुराव पेंटर यांचा फोटो आहे. तर कॅप्शनमध्ये प्रसादनेबाबुराव पेंटर यांची भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं आहे. मदन माने आणि त्यांची टीम ही कलाकृती निर्माण करण्यासाठी अविरत झटत असल्याचं देखील प्रसादने म्हटलंय. प्रसाद ओकचा जिलेबी आणि गुलकंद हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये प्रसाद मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube