Siddharth Jadhav: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधील घर कधी पाहिलंय का? सिध्दार्थने शेअर केले फोटो
siddharth jadhav : एका कलाकाराने किती प्रतिभासंपन्न असावं याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आपला सिद्धू. अभिनेता सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav). या कलाकाराचा कलेच्या क्षेत्रातील आवाका खूप व्यापक आहे. मराठी नाटक, सिनेमा, टेलिव्हिजन, बॉलिवूड, बंगाली चित्रपट अशा सर्वच ठिकाणी अभिनेता सिद्धार्थ जाधव हे नाव गाजलेले आहे.
View this post on Instagram
कलेच्या प्रत्येक मंचावर त्याने आपल्या कलेची जादू दाखवली आहे. मुंबईतील सर्वसाधारण कुटुंबात वाढलेल्या सिद्धार्थचं मराठीवर विशेष प्रेम आहे. म्हणूनच, मराठी चित्रपट, टीव्ही आणि रंगमंच हेच त्याचे पहिले प्रेम असल्याचे तो सांगत असतो. मराठी मनोरंजन विश्वात त्याची प्रचंड हवा आहे. आजवर नाटक आणि सिनेमातून त्याने आपल्या भुरळ घातलीच शिवाय बॉलीवूडमध्ये देखील त्याने चांगलेच वेड लावले आहे.
त्यामुळे सिद्धार्थ जाधव हे नाव कायमच लक्ष वेधून घेणारं ठरलं आहे. सध्या तो लंडनमध्ये आहे. यावेळी लंडनमध्ये जाऊन त्याने एका खास ठिकाणाला भेट दिली आहे. आणि या महत्वाच्या वास्तूचे फोटो देखील सिद्धूने शेयर केले आहेत. लंडनमध्ये गेल्यावर प्रत्येक भारतीयांनी आवर्जून बघावी अशी एक वास्तू लंडनमध्ये आहे.
ती म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे घर. लंडन मधील ज्या घरात बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील महत्वाचा काळ घालवला ते हे घर असल्याचे यावेळी त्याने सांगितले आहे. आणि नुकतंच सिद्धूने बाबासाहेबांच्या या घराला भेट दिली आहे. यावेळी सिद्धू अक्षरशः दे घर पाहून भारावून गेला असल्याचे देखील त्याने सांगितले आहे.
त्याने या वास्तूचे काही महत्वाचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. तर सोबत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच लंडन मधील घर… माझा भीमराया असे कॅप्शन देखील दिले आहे. हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले असून अनेकांनी त्यावर कमेंट करत ‘जय भीम’ चा जोरदार जयजयकार देखील केला आहे. सिध्दार्थ जाधवने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.