नाशिकची समांतर रंगभूमी पोरकी आणि निराश्रीत; अभिनेता प्राजक्त देशमुखची खंत

  • Written By: Published:
नाशिकची समांतर रंगभूमी पोरकी आणि निराश्रीत; अभिनेता प्राजक्त देशमुखची खंत

Prajakt Deshmukh on nashik theatre: गेल्या अनेक वर्षांपासून रंगभूमीवर प्राजक्त देशमुख हे नाव लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून परिचित आहे. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांच्या भद्रकाली प्राॅडक्शन्स निर्मित ‘संगीत देवबाभळी’ नाटक गाजले. अभिनेता परेश रावल यांनी एका मुलाखतीमध्येही या नाटकाचे कौतुक केले होते. नाशिककर असलेल्या प्राजक्त देशमुख (Prajakt Deshmukh) यांनी तेथील रंगभूमी बहरण्यासाठी सुविधा, व्यवस्था नसल्याबाबत रोष, खंत व्यक्त करणारी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे ‘माणिक रत्न’ पुरस्काराने सन्मानित

प्राजक्त देशमुख आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की नाशिकची समांतर रंगभूमी पोरकी आहे, निराश्रित आहे. इथे लघुनाट्यगृह नाही. ज्यांच्याकडे जागा आहे. त्यांना नाटकाबद्दल ममत्व नाही. तिथे शक्यता आहे. त्यांना ह्याच्याशी सोयरंसुतक नाही. बाहेर नाशिकची रंगभूमी म्हणून जे गौरवोदगार काढले जातात, ते नाशिकच्या रंगकर्मींनी बाहेर केलेल्या कतृत्वामुळे आहेत. त्यात नाशिकच्या सांस्कृतिक ठेकेदाराचे काडीमात्र योगदान नाही अशा शब्दात देशमुखने फटकारले आहे.ह्या सगळ्याला इथल्या व्यवस्थेचा ढिसाळपण, नाटकाचं पालकत्व सांगणाऱ्या स्थानिक मातृसंस्थांचा आळख, खासगी प्रतिष्ठान आणि सभागृहाचा नाकर्तेपण जबाबदार असल्याचे ते म्हणतो.

नाशिकची समांतर रंगभूमी इतर शहरांमुळे जिवंत
नाशिकची समांतर रंगभूमी, नाशिक सोडून इतर सर्व शहरांच्या म्हणजे पुणे, मुंबईतील कलासक्त, प्रेम, दयाळू, प्रयोगशील, दृष्ट्या लघुनाट्यगृह असलेल्या संस्थांमुळे जिवंत आहे. बहरते आहे आणि भविष्यतही बहरत राहिल, असे प्राजक्त देशमुख म्हणतो. प्राजक्त देशमुखच्या पोस्टवर राजीव नाईक, गिरीश पतके यासारख्या समांतर रंगभूमीवर नवनवीन प्रयोग करणाऱ्या रंगकर्मींनी प्रतिक्रिया दिलीय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या