अभिनेत्री-दिग्दर्शक दिव्या खोसला कुमारला मातृशोक; म्हणाली, मी काही वेळापूर्वी आईला…
Divya Khosala Mother Passed Away : बॉलिवूड अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शक दिव्या खोसला कुमारला (Divya Khosla Kumar) मातृशोक झाला आहे. तिची आईचं निधन झालं आहे. तिने तिच्या सोशलन मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. यावेळी तिने आईसोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. ( Actress and Director Divya Khosala Mother Passed Away )
Video : पत्नीशिवाय पंतप्रधानांनी बंगल्यात राहू नये; लालूंचा मोदींना खोचक टोला
काय म्हणाली दिव्या खोसला?
दिव्याने या पोस्चमध्ये लिहिले की, मम्मा, मी काही वेळापूर्वी माझ्या आईला गमावलं. माझ्या आयुष्यात तिच्या जाण्याने कायमसाठी एक पोकळी निर्माण झाली आहे. मी माझ्यासोबत तुझे अशीर्वाद, मुल्य घेऊन चालत राहिल. माझी सगळ्यात सुंदर आई. तुझ्यापोटी जन्म घेऊन मला खुप अभिमान वाटतो. मी तुझ्यावर खुप प्रेम करते. ओम शांती! असं म्हणत दिव्याने आपल्या आईच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं आहे.
भ्रष्टाचार त्यांचा रक्तात, नाना पटोलेंनी भाजपवर डागली तोफ
कोण आहे दिव्या खोसला?
दिव्या खोसला ही हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माती आणि दिग्दर्शक आहे. त्याचबरोबर ती टी-सीरीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार यांची पत्नी आहे. दिव्याने 2004 मध्ये तेलुगू चित्रपट लव्ह टुडेपासून आपल्या अभिनयातील करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर तिने अब तुम्हारे हवाले वतन साथियों, बुलबुल, सत्यमेव जयते 2 यासांरख्या चित्रपटांमध्ये दिसली होती. त्याचबरोबर तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर तिने यारियां आणि सनम रे यासांरख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच ती काही म्यूझिक अल्बममध्ये देखील दिसली होती.