Box Office Collection: ‘आदिपुरुष’च्या कमाईत घट कायम; ६व्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 30T120322.303

Adipurush Box Office: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा रिलीज झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे. सिनेमातील संवाद आणि व्हीएफएक्समुळे या सिनेमाला चांगलच ट्रोल केलं जात आहे. तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर मात्र हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. हा सिनेमा रिलीज होऊन सहा दिवस झाले आहेत. सहा दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली? याबाबत चला तर मग जाणून घेऊया …

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)


रविवारी (१८ जुलै) या सिनेमाने भारतातील बॉक्स ऑफिसवर ६९.१ कोटींचे कलेक्शन केले आहे. तर सोमवारी (१९ जुलै) या सिनेमाने १६ कोटींची कमाई केली आहे. तसेच मंगळवारी (२० जुलै) सिनेमाच्या बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनमध्ये मोठी घट झाली आहे. मंगळवारी (२० जुलै) या सिनेमाने १०.७० कोटींची कमाई केली आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या कमाईमध्ये बुधवारी (२१ जुलै) मोठी घट झाली आहे. बुधवारी या सिनेमाने ७.५० कोटींची मोठी कमाई केली आहे. भारतातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने ६ दिवसात २५५.३० कोटींची एकूण कमाई केली आहे.

तसेच आदिपुरुष सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ६ दिवसांत ४१० कोटींची कमाई केली आहे. टी-सीरिजने ट्विटरवर ट्वीट शेअर करुन आदिपुरुष सिनेमाचे तिकीट दर १५० रुपये करण्यात आल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. २२ आणि २३ जून रोजी आदिपुरुष हा सिनेमा चाहत्यांना १५० रुपयात पाहायला मिळणार आहे.

International Yoga Day: सेलिब्रिटींनी असा साजरा केला योग दिवस, सोशल मिडीयावर Video Viral

‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ओम राऊतने (Om Raut) सांभाळली आहे. या चित्रपटात प्रभास रामाच्या तर कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेमध्ये आहे. सनी सिंह लक्ष्मणाच्या तर देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. सैफ अली खानने या चित्रपटात रावणाची भूमिका साकारली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ सिनेमाचा जोरदार बोलबाला बघायला मिळाला होता. हिंदीत या सिनेमाने ३७.२५ कोटी आणि तेलुगूमध्ये ४८ कोटींची मोठी कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाने १४० कोटींचा मोठा गल्ला जमवला आहे.

Tags

follow us