Adipurush आपटला, शाहरूखच्या पठाणची कमाई सुरूच, बांग्लादेशात हॉलिवूडचं रेकॉर्ड तोडलं

Adipurush आपटला, शाहरूखच्या पठाणची कमाई सुरूच, बांग्लादेशात हॉलिवूडचं रेकॉर्ड तोडलं

Shahrukh Khan Pathan : अभिनेता प्रभासचा (Prabhas) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा रिलीज झाल्यापासूनच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईवर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे. रिलीजच्य आठव्या दिवशी तर चित्रपटाची कमाई अगदीच मंदावली. आठव्या दिवशी केवळ 3.50 कोटी या चित्रपटाने कमावले आहेत. दुसरीकडे मात्र शाहरूखच्या पठाणची रेकॉर्डब्रेक कमाई सुरूच आहे. ( Adipurush flop Shahrukh Khans Pathan break records of Hollywood in Bangladesh)

‘उगाच तोंडाच्या वाफा दवडू नका, ते तुमचंच भूत’; फडणवीसांवर राऊतांचा पलटवार

आता तुम्ही म्हणाल शाहरूख पठाण तर आता थिएटरमध्ये नाही. मग कमाई कशी? तर पठाणने ही कमाई भारतात नाही तर बांग्लादेशात रिलीज झाल्यानंतर केली आहे. यावेळी पठाणने बांग्लादेशात देखील बक्कळ कमाई करत हॉलिवूड चित्रपटांचं देखील रेकॉर्ड तोडलं आहे. कारण बांग्लादेश बॉक्स ऑफिसवर त्याने अवतार 2 आणि डॉक्टर स्ट्रेंज, थॉर 4 या चित्रपटांचं रेकॉर्ड तोडलं आहे. पठाण हा जगभरात रिलीज झालेला पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. तर अद्याप देखील त्याची कमाई सुरूच आहे.

रशियासह पुतिन यांचं टेन्शन वाढवणारा येवगेनी प्रीगोझिन नेमका कोण?

या चित्रपटाने भारतासह देशभरात हजार कोटींचा टप्पा पार केल्यानंतर आता बांग्लादेशमध्ये देखील दमदार ओपनिंग केली. तर हा बांग्लादेश बॉक्स ऑफिसवर गेल्या 2 वर्षांत एवढी ओपनिंग कमाई करणारा पहिला विदेशी चित्रपट ठरला आहे. सध्या पठाणने बांग्लादेशात सुरूवातीच्या काही दिवसांतच फक्त 40 स्क्रिनवर 15,000 पेक्षाा जास्त तिकीटं विकली. तर विकेंडपर्यंत ही विक्री 40,000 वर गेली.

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा सुरूवातीला जगभरात 8000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. या सिनेमात शाहरुखसह दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) देखील मुख्य भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube