Advance Booking: बॉक्स ऑफिसवर ‘मैदान’ नावाचं वादळ! रीलिजआधीच झालंय ‘एवढ्या’ कोटींचं बुकिंग
Maidaan Advance Booking: यंदाची ईद चाहत्यांसाठी खूप छान असणार आहे. यावेळी ईदच्या (Eid) दिवशी चाहत्यांसाठी दुहेरी धमाका असणार आहे. एक नाही तर दोन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. एक अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Mian Chote Mian) आणि दुसरा अजय देवगणचा (Ajay Devgn) मैदान (Maidaan Movie) . या दोन्ही चित्रपटांबद्दल लोकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर (box office) एकमेकांशी टक्कर देणार आहेत. मैदान सिनेमाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने जोरदार कमाई करण्यास सुरुवात केली आहे.
अजय देवगणच्या ‘मैदान’ सिनेमात अभिनेत्यासोबत गजराज राव आणि प्रियामणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटात अजय देवगण फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीमच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहते खूप दिवसांपासून या क्रीडा नाटकाची वाट पाहत होते.
पहिल्या दिवशी इतक्या कोटींचा गल्ला कमावला
अजय देवगणच्या ‘मैदान’ सिनेमाचे फक्त मर्यादित शो आहेत. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, मैदानाच्या ॲडव्हान्स बुकिंगमधून मिळणारी कमाई वाढत आहे. आतापर्यंत या चित्रपटाची 9942 तिकिटे विकली गेली आहेत. त्यापैकी 9813 तिकिटे 2डी स्क्रीनची आहेत तर 129 तिकिटे आयमॅक्स 2डी सिनेमाची आहेत. त्यानुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी आतापर्यंत 22 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. हे उत्पन्न आणखीचं वाढणार आहे.
Chhatrapati Sambhaji Maharaj यांची महती सांगणारी आरती प्रदर्शित; आनंदी वास्तु प्रोडक्शनची निर्मिती
‘बडे मियाँ छोटे मियाँ’शी स्पर्धा असणार
अजय देवगणच्या मैदानासोबतच अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हाही ईदला प्रदर्शित होणार आहे. या मोठ्या स्टारकास्टच्या चित्रपटात अक्षय कुमारसोबत टायगर श्रॉफ, सोनाक्षी सिन्हा, मानुषी अलाया एफ देखील दिसणार आहेत. या चित्रपटाची आतापर्यंत 12 हजार तिकिटे विकली गेली आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत 60 लाखांचा व्यवसाय केला आहे. रिलीजच्या तारखेपर्यंत या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे.