आज्जी निघाली शाळेला! ‘म’ मोबाईलचा सोडून ‘म’ मराठीचा…

Ajji Bai Jorat Al Based Fantasy Comedy Play : जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित क्षितीज पटवर्धन लिखित दिग्दर्शित म मराठीचा म्हणत (Entertainment News) मराठीतील पहिलं AI महाबालनाट्य ‘आज्जी बाई जोरात’ ह्या (Ajji Bai Jorat) नाटकाने मराठी रंगभूमीवर उन्हाळ्याच्या सुट्टीत धम्माल (Comedy Play) केली. बालकांसोबतच पालकांनी सुद्धा आज्जीला आपलंसं केलं. हसत, गात, नाचत, बागडत आताच्या पिढीत मराठीची (Marathi Play) गोडी निर्माण केली.
निर्मिती सावंत, अभिनय बेर्डे, मुग्धा गोडबोले, अभिजीत केळकर, जयवंत वाडकर यांसह 11 कलाकारांची मांदियाळी भरलेली दिसते. आजच्या पिढीला मोबाईलच्या विश्वातून बाहेर काढून त्यांच्या हातात पुस्तकं पुन्हा येऊ घालत आहेत, ते या नाटकामुळे…अशी अनेक मान्यवर आणि प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिली.
सोनम-राजच्या प्रेमकथेत… 10 रूपयांची अर्धी नोट, राजा रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट, हवाला व्यवसाय…
या नाटकामुळे ह्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुस्तकांचा खप सुद्धा वाढल्याची माहिती समोर आली. परंतु आताच्या घडामोडींना पाहता आज्जीने प्रत्येक शाळांमध्ये जाऊन ही मराठीची गोडी निर्माण करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मराठीच सक्तीची नाही ही घटना अत्यंत दुःखद आहे. एकीकडे मराठीला मिळणारा अभिजात भाषेचा दर्जा आणि दुसरीकडे तिला तिच्याच माहेरी बेदखल करण्याची प्रक्रिया… कुठेतरी आपण मराठी भाषिक म्हणून एक पाऊल उचललायला हवं.
ट्रम्प यांनी इराणला 14 दिवसांचा वेळ का दिला? ‘टैको प्लॅन’चं सिक्रेट नेमकं काय…
पुढील पिढीला म मोबाईलचा सोडून म मराठीचा गिरवता यावा म्हणूनच आता आज्जी निघाली आहे शाळेत. दिनांक 06 जुलै 2025 रोजी साने गुरुजी इंग्लिश मिडीयम शाळेच्या विद्यार्थी, पालक आणि कर्मचाऱ्यांसाठी दु. 4 वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे “आज्जी बाई जोरात” या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. या प्रयोगासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षकेतर कर्मचारी यांसाठी सवलतीच्या दरात तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. आज्जी घराघरात तर पोहचलीच आहे. आता आज्जी सुद्धा नातवंडांसोबत निघाली आहे शाळेत. तुम्ही सुद्धा मराठीच्या ह्या सफरीत सहभागी व्हा आणि म मराठीचा गिरवूया…