Akanksha Dubey Suicide Case : अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या मृत्यूप्रकरणी ‘या’ गायकाला अटक

Akanksha Dubey Suicide Case : अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या मृत्यूप्रकरणी ‘या’ गायकाला अटक

Akanksha Dubey Suicide Case: भोजपुरीची अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी गायक आणि निर्माता समर सिंहला (Samar Singh) अटक करण्यात आली आहे. समर सिंहला गाझियाबादच्या नंदग्राम पोलीस स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली आहे. आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर समर सिंह फरार झाला होता. आकांक्षा दुबेच्या आईने समर सिंहवर गंभीर आरोप लावले आहेत.

समर सिंहला आज गाझियाबाद न्यायालयात हजर केले जाणार आहे, तेथून ट्रान्झिट रिमांड घेण्यात येणार आहे, यानंतर पोलीस त्याला वाराणसीला आणणार आहेत. समर सिंह याला नंदग्राम पोलीस ठाण्यात ठेवण्यात येणार आहेत. समर हा चार्म क्रिस्टल सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून लपून बसला होता, त्याच्या शोधात पोलीस अनेक ठिकाणी छापे टाकत होते. आकांक्षा हिच्या आत्महत्येनंतर ११ दिवसांनी आरोपी समर सिंहला अटक करण्यात आली.

आकांक्षा दुबेच्या आईनं केलेले गंभीर आरोप

२५ वर्षीय आकांक्षा दुबे ही आगामी सिनेमाच्या शुटिंगकरिता वाराणसीला गेली होती. शुटिंगच्या दरम्यान ती सारनाथ येथील एका हॉटेलमध्ये थांबली होती. आकांक्षाने गळफास घेतल्यावर तिच्या मेकअप आर्टिस्टने तिला पहिल्यांदा त्या अवस्थेत बघितलं आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. आकांशाच्या आईने समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Akash Thosar : वडिलांबरोबरचा ‘तो’ किस्सा सांगत आकाश ठोसर झाला भावुक

आकांशाला ब्लॅकमेल करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आकांशाच्या आईने समर आणि संजयवर करण्यात आले आहेत. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. आकांक्षाच्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर आकांक्षा आणि समर एका पार्टीला गेले होते, असं सांगण्यात येत आहे. 25 मार्चच्या रात्री आकांक्षा तिच्या बर्थडे पार्टीकरिता गेली होती. तेव्हा ती आनंदी होती. या पार्टीला ब्रेकअप पार्टी असे नाव देण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे.

आकांक्षा आणि समर सिंह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आकांक्षा- समर यांची भेट ३ वर्षांअगोदर झाली होती, अशी माहिती मिळाली आहे. टिकटॉक आणि इनस्टाग्रामच्या माध्यमातून आकांक्षाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. टिकटॉकवर तिचे व्हिडीओ पोस्ट केले की काही मिनिटांत व्हायरल व्हायचे. इन्स्टाग्रामवर देखील तिचे १.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. आकांक्षाने वयाच्या १७ व्या वर्षी तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले होते. वीरों के वीर’ आणि ‘कसम पैदा करने वाले की २’ सारख्या सिनेमामध्ये काम केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube