Natya Parishad : प्रशांत दामले विरूद्ध प्रसाद कांबळी; कोण होणार नवा अध्यक्ष?

Natya Parishad : प्रशांत दामले विरूद्ध प्रसाद कांबळी; कोण होणार नवा अध्यक्ष?

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad President Election) अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे. प्रशांत दामले (Prashant Damle) विरूद्ध प्रसाद कांबळी (Prasad Kambali) अशी ही निवडणूक राहणार आहे. या निवडणूकीत राजकीय हस्तक्षेप बघायला मिळत आहे.

प्रसाद कांबळींना आशिष शेलार तर प्रशांत दामलेंना उदय सामंत यांचा पाठिंबा आहे. या निवडणूकीकरिता 60 सदस्य आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या गेल्या महिन्यामध्ये पार पडलेल्या निवडणूकीत प्रसाद कांबळी यांचे ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले यांचं ‘रंगकर्मी समूह’ मध्ये निवडणूक झाली आहे. या निवडणुकीमध्ये प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी समूहा’चे १० तर प्रसाद कांबळी यांच्या पॅनलचे ४ उमेदवार नियामक मंडळावर निवडून आले आहे.

Vaibhav Mangale : कुणी कुठे कशी दाद मागावी? नाट्यगृहांच्या दुरावस्थेवर वैभव मांगले भडकले

यामुळे आता अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलमध्ये 10.30 च्या सुमारास निवडणूक पार पडली आहे. नियामक मंडळाचे ६० सदस्य १९ जणांना मतदान करणार आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये १ अध्यक्ष, २ उपाध्यक्ष, १ कार्यवाहक, ३ सहकार्यवाहक, १ कोषाध्यक्ष आणि ११ सभासदांचा समावेश राहणार आहे.

Cannes Film Festival 2023 : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला आजपासून सुरुवात; ‘या’ अभिनेत्रीचा रेड कार्पेटवर डेब्यू!

नाट्यपरिक्षदेचा अध्यक्ष आणि कार्यवाही यांच्यासह या अन्य नेमणूका देखील महत्त्वाच्या राहणार आहेत. तसेच विनाश नारकर, अजित भुरे, वीणा लोकूर, भाऊसाहेब भोईर, शैलेश गोजमगुंडे, सतीश लोटके, समीर इंदुलकर, सुकन्या कुलकर्णी, ऐश्वर्या नारकर, सविता मालपेकर, सुशांत शेलार हे कार्यकारी समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube