नात्यांच्या गाठी, भावना आणि आठवणींचा हळुवार स्पर्श! ‘अमायरा’ चा ट्रेलर प्रदर्शित

नात्यांच्या गाठी, भावना आणि आठवणींचा हळुवार स्पर्श!  ‘अमायरा’ चा ट्रेलर प्रदर्शित

Amaira Official Trailer Released : संपूर्ण महाराष्ट्रभर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या दर्जेदार सिनेमांच्या मालिकेत (Marathi Movie) अजून एक हृदयस्पर्शी चित्रपटाची भर पडत आहे. नात्यांचे गुंतागुंतीचे रंग उलगडणारा, विविध भावनांना स्पर्श करणारा आणि नात्यांच्या शोधात असलेल्या प्रत्येकाच्या मनाला भिडणारा मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अमायरा’ (Amaira Movie) या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झालाय. भावनांनी व्यापलेली नात्यांची उत्कट (Entertainment News) कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या ट्रेलरमध्ये नात्यांतील प्रेम, दुरावा, समज-गैरसमज आणि एकमेकांना समजून घेण्याचा संघर्ष अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. त्याच बरोबर अमायराच्या आयुष्यातील काही कठीण निर्णयांचे क्षण सुद्धा आपण पाहू (Amaira Trailer) शकतो. ‘अमायरा’ केवळ एक कथा नाही, तर अनेकांच्या आयुष्यातील वास्तवाचा आरसा वाटतो. ट्रेलर शेवटी एक विचार देऊन जातो, कधी नातं शोधावं लागतं, आणि कधी स्वतःला… जो मनात खोलवर घर करतो.

सामाजिक प्रतिष्ठा, मानसन्मान मिळणार! तुमचे आजचे राशिभविष्य काय सांगते ?

लोकेश गुप्ते ह्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तर मुक्ता आर्टस् ने निर्मिती केली आहे. ए. व्ही. के.एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंटच्या अंतर्गत हा सिनेमा बनला आहे. चित्रपटात अजिंक्य देव, राजेश्वरी सचदेव, पूजा सावंत, सई गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सगळ्यांनी चित्रपटात साकारलेली भावस्पर्शी पात्रं ही प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःची वाटू शकतात, एवढा या कथानकात गहिरा भावनिक प्रवास आहे.

पूर्ण ताकदीने लढणार, पालिका निवडणुकीसाठी MIM चा मोठा निर्णय

चित्रपटाचे संगीत, पार्श्वसंगीत आणि छायाचित्रण हे देखील या चित्रपटाच्या आत्म्यातील महत्त्वाचे पैलू आहेत. नात्यांमधल्या सूक्ष्म भावना, गैरसमज, आत्मीयता आणि शोध यांचं सुरेख चित्रण म्हणजेच ‘अमायरा’. या सिनेमाचे दिग्दर्शक लोकेश गुप्ते हे आहेत तर लेखक मिहीर राजदा आहेत. तसेच राहुल पुरी, स्वाती खोपकर, सुरेश गोविंदराय पै निर्माते आहेत. तसेच सह निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेज पटेल हे आहेत. ‘अमायरा’ हा सिनेमा 23 मे 2025 ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube