काळी जादू, प्लँचेट… जारण ! मराठीतला अस्सल सायको थ्रिलर

काळी जादू, प्लँचेट… जारण ! मराठीतला अस्सल सायको थ्रिलर

Amit Bhandari Review On Jaran Movie Anita Date : लेखक दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते यांचा जारण हा चित्रपट (Jaran Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावर सोहम डिजीटलचे सीईओ अमित भंडारी यांचे समीक्षण.

दरीच्या तळाशी जसा सूर जातो… तशी झिरपत जाणारी भीती मनाला वेढून घेते… भय फेर धरून नाचायला लागते. भीतीला असणारा अनामिकपणा (Marathi Movie) अधिक घनगर्द होऊ लागतो.. भोवताली असणाऱ्या पात्रांच्या आयुष्याशी नकळत जोडले (Entertainment News) जात असताना भीतीचे सावट येते.

ब्लॅक मॅजिक… काळी जादू… प्लँचेट… जारण यांच्या गर्तेत अडकलेली रुतलेली राधा आणि तिला त्या काळडोहात लोटणारी गंगुट्टी यांच्या भोवती प्रामुख्याने फिरत राहते. लहानपणी राधावर त्यांच्या वाड्यात राहणाऱ्या गंगुट्टीने तिच्यावर (Anita Date) जारण केले आहे. आयुष्यात तिला सुख लाभणार नाही… तिचे वाटोळे होईल… असे तिने मंत्रोच्चाराने लिंबांनी वर्तुळाकार केलेल्या काळया बाहुलीवर कुंकू उधळत तिला दिलेला शाप आहे, ज्याला उ:शाप नाही. अश्वत्थामा च् जखमे सारखा भाळी लिहिलेले दुःखाचे भोग घेऊन ही राधा जगते आहे. तिची मुलगी आणि ती…

बॉलीवूड अभिनेते जितेंद्र झाले मालामाल; तब्बल ‘इतक्या’ कोटींना विकली मालमत्ता

तिच्या आयुष्याला दिलेल्या या शापामुळे तिची फरफट सुरूच आहे. जगण्याला काळवंडून टाकणारी. भयाने वेढून टाकणाऱ्या राधेच्या आयुष्यात एक अपघात होतो. जगण्याला न भरून निघणारी एक जखम होते, या जखमेचा दाह तिचं संपूर्ण आयुष्य उध्वस्त करून टाकतात मनाने शरीराने आणि आत्म्याने ग्रास दिल्या. या राधेच्या आयुष्यात नेमकं काय दुष्टचक्र सुरू आहे, हे तिच्या मनोवस्थेचे खेळ या सगळ्यांमध्ये आपल्याला आणून लेखक दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते आपल्याला उभं करतात.

गोष्टीचा प्लॉट इंटरेस्टिंग आहे गेल्या काही वर्षात आलेल्या महत्त्वाच्या भयपट / सायको थ्रिलर यामध्ये या सिनेमाची नक्कीच गणती होऊ शकेल. मनातील भीतीच्या आदिम भावनेचा मागोवा घेण्याचा प्रवास हा रंजक वळणावर घेऊन जातो. संगीतकार उत्तम गायक असेल तर त्याला अपेक्षित असलेल्या गाण्यातील जागा तो नेमक्या खुबीने गाऊन दाखवू शकतो, त्याच पद्धतीने काही सीन्स ऋषिकेश गुप्ते यांनी उत्तम पद्धतीने क्राफ्ट केलेले आहेत. दिग्दर्शक म्हणून मनात दडकलेली भीतीची पेशी उलगडून दाखविताना त्यांनी रंजकतेचे पदर अलगदपणे उलगडून दाखविलेले आहेत.

अमृता सुभाषने तिच्या सोबत जपलेली राधा ती तिचे अनेक पदर उलगडते. भीतीची लकेर तिच्या चेहऱ्यावर उमटत असताना मनातील जाणीवांचा सुरू असलेला कल्लोळ त्याची आंदोलन दाखवण्यात ती निश्चितच यशस्वी होते. मांडी ठोकून बसण्याची तिची खास शैली, भयग्रस्त झाल्यावर होणारा चेहरा आणि त्यातून स्विच होत असताना तिने वापरलेली अनेक ट्रान्झिशन्स ही उत्तम अभिनेत्री असल्याची जाणीव सातत्याने करून देते. तिचे सई सोबतचे सीन्स, पाण्यात चालत असतानाचा तिचा ‘वॉक’, प्लांट चीट करत असतानाचा सिक्वेन्स, बाहुली सोबतचे तिचे सीन्स या सगळ्यांमध्ये आत्तापर्यंत भासलेली अमृता आणि आत्ताची अमृता यामध्ये निश्चितच अनुभव संपन्नतेचा असणारा बदल हा प्रेक्षक म्हणून आपल्यालाही समृद्ध करणारा आहे.

फोन पे युजर्ससाठी गुड न्युज! ‘या’ लोकांना करता येणार विना इंटरनेट पेमेंट

अनिता दाते ही कसलेली, गुणी, अभ्यासू अभिनेत्री आहे. तिने साकारलेली गंगुटी तिचे दात विचकावून हसणं, तिने भाषेचा पकडलेला लहजा, तिची देहबोली आणि भीती वाटावी अशी साकारलेली व्यक्तिरेखा तिच्या आजपर्यंतच्या कामाला एक वेगळे परिमाण देणारी आहे. तिच्या वैयक्तिक दुःखाला असणारी सबळ कारण आणि तिची त्यामागची भूमिका ही अधिक सुस्पष्ट होणे नितांत गरजेचं होतं. तिच्या मनातला संघर्ष किंवा तिच्या व्यक्तिरेखेला असलेला आलेख हा काही अंशी अपूर्ण वाटतो, तरीही तिची व्यक्तिरेखा मनावर कोरली जाते, हे तिच्या अभिनयाचे शक्तिस्थान म्हणायला हवं. माझ्या नवऱ्याची बायको याच्या पलीकडे तिचे नाट्य चौफुला मधील काम किंवा जालना मधील काम ही तिच्या अभिनयाची खऱ्या अर्थाने चुणूक आहे.

किशोर कदम यांनी साकारलेले डॉक्टर धनंजय कुलकर्णी यांचे पात्र तितकेच तारतम्य बाळगणारे आहे, कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धांच्या मधला दुवा आहे. त्यांनी समजून उमजून केलेले काम महत्वाचे आहे. स्नेहल शिदमने देखील मोजके सीन्स मध्ये स्वतःची छाप पडलली आहे. धनंजय सरदेशपांडे यांच्या असण्याने उपाध्ये गुरुजी जिवंत वाटतात. विक्रम गायकवाड, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, प्राजक्ता दातार यांनी आपले काम चोखपणे केले आहे.

मिलिंद जोग यांचा कॅमेरा तितकाच प्रभावीपणे बोलतो. ए व्ही प्रफुल्लचंद्र हा प्रयोगशील संगीतकार आहे, पण यावेळी बॅकग्राऊंड स्कोअर मध्ये त्याने काम लक्ष वेधून घेणारे केले आहे. मेटल इन्स्ट्रुमेंटस चा केलेला वापर प्रभावी आहे, पण त्याच्याकडून नव्या नाद निर्मितीची अपेक्षा होती… त्या बाबतीत त्याने स्वतःच्या गुणवत्तेला न्याय दिलेला नाही. अभिजीत देशपांडे यांचे संकलन परिणामकारकता साधते. गंगुट्टीच्या पार्श्वभूमीचा… तिच्या वेदनेचा ठाव अस्पष्ट राहतो. तो दुवा जोडला जायला गेला असता, तर त्या भेसूर दुःखाला वेदनेची कणव मिळाली असती.

का पाहावा – भीतीचा.. भयपटाचा नवा चेहरा. मराठीतला सायको थ्रिलर एक पाऊल पुढे गेलाय म्हणून

का टाळावा – भयपट / सायको थ्रिलर पाहताना डोळे बंद करत असाल तर

थोडक्यात काय – गूढ… अज्ञात… अनामिक भीतीच्या सावटाची चाहूल… ह्रषिकेश गुप्ते यांचे प्रभावी लिखाण आणि दिग्दर्शन… अमृता सुभाष आणि अनिता दाते यांचा दमदार आणि तितकाच नजाकतभरा परफॉर्मन्स यासाठी आवर्जून पाहायला हवा… जारण…

या सिनेमाला मी देतो साडे तीन स्टार्स.
अमित भंडारी
चित्रपट समीक्षक

——————————————-
जारण

प्रस्तुतकर्ता – अनीस बज्मी
निर्माते – अमोल भगत, नितीन भालचंद्र कुलकर्णी
सह-निर्मिती* – मनन दानिया
लेखन आणि दिग्दर्शन* – हृषिकेश गुप्ते
कलाकार –
अमृता सुभाष –
अनिता दाते
किशोर कदम
ज्योती माळशे
राजन भिसे
सीमा देशमुख
विक्रम गायकवाड
अवनी जोशी

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube