अमृता खानविलकर सादर करणार स्त्रीशक्तीचे अनोखे रूप, “वर्ल्ड ऑफ स्त्री” मध्ये दिसणार

अमृता खानविलकर सादर करणार स्त्रीशक्तीचे अनोखे रूप, “वर्ल्ड ऑफ स्त्री” मध्ये दिसणार

Amrita Khanwilkar : अमृतकला स्टुडिओ आणि ‘अर्थ’ एनजीओ प्रस्तुत ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ (World of Stree) हा अनोखा नृत्याविष्कार घेऊन अमृता खानविलकर (Amrita Khanwilkar) रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच एखादी अभिनेत्री एका स्वयंसेवी संस्थेसोबत संलग्न होत, नृत्यकलेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे अनोखे रूप सादर करणार आहे. यात शक्ती, भक्ती, शृंगार आणि स्त्री तत्त्व यांचा समावेश आहे.

तसेच तिने आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. ती एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तिचा नृत्याविष्कार रसिकांनी अनेकदा पाहिला आहे. असाच एक अनोखा नृत्य नजराणा अमृता खानविलकर ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ च्या माध्यमातून घेऊन येत आहे.

‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ च्या माध्यमातून अमृताचे थेट प्रेक्षकांसमोर नृत्यप्रयोग सादर करण्याचे स्वप्न देखील साकार होणार आहे. या नृत्यप्रयोगामध्ये क्लासिकल, सेमी क्लासिकल म्युझिक आणि नृत्याची अनोखी मैफल प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. तसेच या नृत्यप्रयोगामध्ये स्त्रीशक्ती, महिला सक्षमीकरण, शृंगार, भक्ती यांचे देखील दर्शन घडणार आहे. यात तिच्यासोबत नृत्यदिग्दर्शक कुशल नर्तक आशिष पाटील देखील सहभागी होणार आहेत.

या नृत्याविष्काराची मैफल 90 मिनिटांची असून पुढील येणाऱ्या काळात विविध नाट्यगृहात हा प्रयोग होणार आहे. येत्या 24 ऑगस्टला ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ चा पहिला प्रयोग टाटा थिएटर, एनसीपीएमध्ये सादर होणार आहे. अमृता खानविलकर एक अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहेच पण तिच्या नृत्याविष्काराची एक विशिष्ट बाजू प्रेक्षकांना या निमित्ताने जवळून अनुभवायला मिळणार आहे.

‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ या नृत्याविष्काराबद्दल अमृता खानविलकर सांगते, “नृत्यकला हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ च्या आविष्कारामुळे नृत्य, संगीत, नाट्य या तिन्ही कलांची सांगड घालून एक अनोखी कलाकृती रसिकांसमोर येतेय, याचा मला अत्याधिक आनंद होतोय. नृत्य हे भावना व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे मला यातून व्यक्त व्हायला नेहमीच आवडते. त्यामुळे अशा या भावपूर्ण मैफलीत रसिकांचे मनोरंजन करण्यात मला कुशल नर्तक आशिष पाटील यांची साथ लाभणार आहे.

भाऊबीज परत घेतली जात नाही; सावत्र भावाची उपमा देत फडणवीसांचं विरोधकांना उत्तर

माझ्या जीवनातील एक स्वप्न साकार होणार असून प्रेक्षकांना हा आमचा नवीन प्रयोग नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे. हा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 5 (SDG 5-Gender Equality) शी सुसंगत असून स्त्री सक्षमीकरण, स्त्री शक्ती मूल्यांना प्रतिबिंबित करणारा असून सदर प्रयोग प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यास उत्सुक आहे. माझ्या कलेचा वापर करून समाजात जागरूकता निर्माण करण्याचे माझे स्वप्न होते आणि ते या संस्थेच्या सहकार्याने पूर्ण होत आहे, याचा मला अत्यानंद होत आहे.”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube