Veer Murarbaji: राम-सीतेची लोकप्रिय जोडी पुन्हा ‘वीर मुरारबाजी’ मध्ये झळकणार
Arun Govil and Dipika Chikhlia in Marathi Movie: जवळपास 30-35 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारित झालेली ‘रामायण’ ही (Ramayana) मालिका प्रचंड गाजली. विशेषतः राम आणि सीतेच्या जोडीला चाहत्यांनी अक्षरशः आपल्या हृदयात एक महत्वाचं स्थान दिल्याचे पाहायला मिळालं आहे. (Marathi Movie) या मालिकेत प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) तर सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया (Deepika Chikhalia) यांनी त्याकाळी प्रत्येक घराघरांत-मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच (Ram-Sita) विशेष आदराचं स्थान निर्माण केलं आहे.
या राम-सीतेच्या जोडीची अफाट लोकप्रियता आज देखील तितकीच कायम असून त्यांच्या अभिनयाची एक अनोखी जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. ‘वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून ही जोडी आत्ता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. निर्माते अजय आरेकर यांनी या मराठी सिनेमाची घोषणा केली आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पुरंदरच्या लढाईत ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा भव्यदिव्य स्वरूपात रुपेरी पडद्यावर मांडणारा ‘वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ हा मराठी सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आला आहे. आजच्या पिढीला आपल्या स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास बघता यावा, यासाठी आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ही चित्ररूपी चळवळ उभारली आहे.
Rohit Saraf:… म्हणून रोहित सराफचा ‘वो भी दिन द’ जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला
‘वीर मुरारबाजी’ सिनेमात शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता अंकित मोहन दिसणार आहे. उच्च निर्मितीमूल्य, दर्जेदार तंत्रज् आणि त्याला असलेली उत्तोमोत्तम कलाकारांची जोड यामुळे चित्रपटाबद्दलची मोठी उत्सुकता लागली आहे.