Asha Bhosle: ‘…अन् मी या इंडस्ट्रीची शेवटची मुघल’, आशा भोसलेंच्या विधानाने चर्चांना उधाण

Asha Bhosle: ‘…अन् मी या इंडस्ट्रीची शेवटची मुघल’, आशा भोसलेंच्या विधानाने चर्चांना उधाण

Asha Bhosle Tweet Viral : जेष्ठ लोकप्रिय गायिका आशा भोसले यांनी कायम आपल्या आवाजानं एक अनोखी छाप चाहत्यांच्या मनात उमटवली आहे. (Asha Bhosle) आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू, तामिळ, इंग्रजी अशा जवळपास २० भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. (Tweet Viral) एक हजारपेक्षा जास्त चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली. भजन असो वा गझल, लोकगीत असो किंवा लावणी, कव्वाली, युगुलगीत, उडत्या चालीची गाणी, पाश्चिमात्य पद्धतीची अशी वेगवेगळ्या धाटणीची गाणी त्यांच्या गळ्याला शोभताना आपण पाहिली आहेत.

त्या नेहमी त्यांच्या मनोगतातून वय हा माझ्यासाठी नेहमीच एक वेगळा विषय राहिल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. तसेच प्रत्येकवेळी आशाजींनी चाहत्यांना आणि नवीन कलाकारांना चांगली शिकवण दिली आहे. कधीही कुणाची निंदा न करणे, नेहमी आपल्यापेक्षा मोठा कलाकाराचा आदर करणे, नवोदित कलाकारांचा उत्साह वाढवणे, त्यांना मार्गदर्शन करण्यात आशाजी कायमच अग्रेसर राहिल्याचे पाहायला मिळत असतात.

अनेक रियॅलिटी शो मधून देखील आशाजी यांनी काही कलाकारांना मार्गदर्शन करताना दिसून येत असतात. एवढेच नव्हे तर लहान मुलांना देखील मोठ्या प्रेमानं त्यांनी जवळ घेऊन समजावून सांगितले आहे. परंतु आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या त्या ट्विटने चाहत्यांचे चांगलच लक्ष वेधून घेतलायचे पाहायला मिळत आहे. आशाजींना त्या ट्विटमधून नेमकं काय म्हणायचं आहे, असा सवाल सध्या उभा केला जात आहे.

Kirkol Navre: नवं कोरं धम्माल विनोदी नाटक “किरकोळ नवरे”

आशाजी त्या ट्विटमध्ये असे सांगतात की, मी बॉलीवूडमधील एकमेव अशी व्यक्ती आहे की, जिला बॉलीवूडचा संपूर्ण इतिहास माहिती आहे. मी जर त्याबद्दल सांगायला लागले तर मग ३ ते ४ दिवस देखील मला अपूरे पडणार आहेत. मी कोणतीही गोष्ट आजून विसरले नाही. मी या इंडस्ट्रीमधील शेवटची मुघल असल्याचे आशाजी यांनी त्या ट्विटमध्ये विधान केले आहे, या विधानाने सध्या त्यांची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube