Ashok Saraf : अशोक सराफ यांना ‘मामा’ नाव कसं पडलं? सांगितला ‘तो’ किस्सा

Ashok Saraf : अशोक सराफ यांना ‘मामा’ नाव कसं पडलं? सांगितला ‘तो’ किस्सा

Khupte Tithe Gupte Ashok Saraf : अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) लोकप्रिय ‘खुप्ते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी देखील हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अशोक सराफ त्यांना मामा नाव कसं पडलं हे सांगत असतानाचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)


अशोक सराफ हे ‘मामा’ या नावाने ओळखले जातात. मराठी-हिंदी मनोरंजसृष्टीसह चाहतेदेखील त्यांना मामा म्हणूनच हाक मारत असतात. आजवर त्यांना चाहत्यांचा मिळालेल भरभरून प्रेम आहे. तसेच मामांचा मोठा चाहतावर्ग देखील आहे. मराठी-हिंदी सिनेमे, मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची सर्वांवरती भुरळ पडली आहे. आता अवधूत गुप्तेच्या ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये त्यांनी हजेरी लावली आहे, त्यांना मामा नाव कसं पडलं याचा मोठा खुलासा केला आहे.

‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा प्रोमो सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अवधूत गुप्ते अशोक सराफ यांना प्रश्न विचारत असल्याचे दिसून येत आहे. तुम्हाला मामा म्हणण्याची सुरुवात कुठून झाली? यावर उत्तर देत अवधूत गुप्ते म्हणाले की, कोल्हापुरात मामा म्हणणं खूप मानाचं मानले जाते. कोल्हापुरामध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान आमचा कॅमेरामॅन त्यांच्या छोट्या मुलीला एकदा सेटवर घेऊन आला आणि तिला म्हणाला, हे बघ…हे कोण? हे अशोक मामा. लेकीला सांगितल्यानंतर तोदेखील मला मामा म्हणू लागला.

Cannes 2023: असा भंगार ड्रेस कोण घालतं ? कान्स फेस्टिव्हलमधील ऐश्वर्या रायच्या लूकची उडवली खिल्ली

अशोक सराफ पुढे म्हणाले, कॅमेरामॅनबरोबर सेटवरील सर्व स्पॉट बॉईज आणि काम करणारी मंडळी छोटी होती. त्यांना मला काय म्हणायचं त्यांच्यासमोर हा मोठा प्रश्न होता. साहेब म्हणणं त्यांना लांबच वाटत होतं आणि अशोक तर ते म्हणू शकत नव्हते. म्हणून मग त्यांनीदेखील मला मामा हाक मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्वच मंडळी मला मामा म्हणू लागली. लोक मला मामा म्हणतात याचा मला जास्त आनंद मिळतो.

अशोक सराफ यांचा ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामधील व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या देखील पसंतीस उतरला आहे. या कार्यक्रमासाठी चाहते मोठे उत्सुक असल्याचे ते कमेंट्स करत सांगत आहेत. अशोक सराफ यांच्या या विशेष भागाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube