Baipan Bhari Deva Official Trailer: केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा…’ चा फूल ऑन धम्माल ट्रेलर प्रदर्शित 

Baipan Bhari Deva Official Trailer: केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा…’ चा फूल ऑन धम्माल ट्रेलर प्रदर्शित 

Baipan Bhari Deva Official Trailer: महाराष्ट्र शाहीरनंतर आता केदार शिंदे ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) हा सिनेमा घेऊन आला आहे. 30 जूनला रीलीज होणार्‍या या सिनेमाचा आज ट्रेलर लॉन्च (movies trailer) झाला आहे. वंदना गुप्ते, सुकन्या मोने, दीप्ती परब, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि रोहिणी हटंगडी यांची ही स्टोरी आहे. घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे असताना ‘मंगळागौर’ मध्ये सहभागी होण्यासाठी बहिणींबरोबर घातलेला घाट सिनेमात एका रंजक कहाणीतून मांडण्यात आला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. गेल्या काही वर्षापासून मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट बनत आहेत. मराठी प्रेक्षकही चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. आताही असाच एक बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ ​​महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारीत ‘महाराष्ट्र शाहीर’ (‘Maharashtra Shaheer’) हा चित्रपट आहे. आज २८ एप्रिल रोजी, केदार शिंदे यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’ महाराष्ट्रभरात रिलीज झाला.

शाहीर साबळे यांच्या जीवनावर केदार शिंदे ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट करत असून त्यामध्ये अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे संगीत अजय अतुल करत आहे. या चित्रपटाचे संगीत प्रेक्षकांमध्ये कमालीचे लोकप्रिय झाले आहे. त्यातील अनेक गाणी चाहत्यांच्या आवडीची आहेत. त्यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रिल्स व्हायरल झाले आहेत.

तुझं नांव ‘सागर’ पण तू तर फुटकं ड्रेनेज, किरण मानेंना ट्रोल करणारा ‘सागर बर्वे’ जेरबंद…

त्यानंतर आता बहुप्रतिक्षित चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’ महाराष्ट्रभरात रिलीज झाला याच खास मुहूर्तावर केदार शिंदेंच्या आगामी चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. ‘बाईपण भारी देवा’ असं या चित्रपटाचं नाव आहे. ‘बाईपण भारी देवा’ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube