Baipn Bhaari Deva चा बॉक्स ऑफिसवर डंका; अवघ्या १० दिवसांत एवढी कमाई!

Baipn Bhaari Deva चा बॉक्स ऑफिसवर डंका; अवघ्या १० दिवसांत एवढी कमाई!

 Box Office Collection: ‘बाईपण भारी देवा’ (Baipn Bhaari Deva) या मराठी सिनेमाने अवघ्या महाराष्ट्रात चाहत्यांच्या मनावर गारुड घातलं आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) देखील चांगलाच गल्ला कमावला आहे. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादू दाखवत आहे. (Marathi Movie) हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता १० दिवस उलटले आहेत. तरी देखील या सिनेमाची थिएटरमध्ये हाऊसफुल (Housefull) गर्दी जमत असल्याचे चित्र दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sukanya Kulkarni Mone (@sukanyamoneofficial)


आता नुकताच या सिनेमाच्या कमाईचा आकडा वाढत जात आहे. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने अतिशय सुंदर विषय अगदी सोप्या पद्धतीने चाहत्यांसमोर सादर केला आहे. या सिनेमात महिलांच्या आयुष्यातील अतिशय रजंक मुद्दे हलक्या- फुलक्या स्वरूपात सादर करण्यात आला आहे. आता या सिनेमाच्या कलेक्शनचे आकडे नुकतेच समोर आले आहेत. या सिनेमाने पहिल्या दिवशी ६.१० कोटींचा दमदार गल्ला कमावला आहे. त्यानंतर आता १० दिवसांत या सिनेमाने २६.१९ कोटींचा गल्ला कमावला आहे.

मराठी सिनेमाच्या दृष्टीने हा एक मोठा टप्पा गाठला आहे. या सिनेमातील कलाकारांनी देखील ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी सांगितले आहे की, ‘बाईपण भारी देवाची संपूर्ण महाराष्ट्रात उत्तुंग भरारी..! मराठी सिनेमाच्या इतिहासातील आजवरचं एका दिवसाचं सर्वाधिक कलेक्शन..! मायबाप चाहत्यांचे खूप खूप मनःपूर्वक आभार! धन्यवाद!’

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

अभिनेत्री सुकन्या मोने यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. एका चाहतीने या पोस्टवर कमेंट करत सांगितले आहे की, ‘बाई पण भारी देवा’च्या संपूर्ण कुटुंबाचे खूप अभिनंदन! मी डॅलसला असते आणि आमच्या येथे पण महाराष्ट्र मंडळ आणि प्राईम मीडियाच्या कृपेने आम्हाला या सिनेमागृहात हा सिनेमा पाहण्याचा आनंद लुटता आला. खरेतर मराठी सिनेमा लागल्याचा अभिमान नेहमी वेगळ्या लेव्हलला असतो. अन् त्यात तो इतक्या उत्कृष्ट दर्जाचा निघाला की खूपच भारी वाटतं आहे. सगळ्या जणी उत्तम कलाकार आणि त्यामध्ये केदार शिंदेचं दिग्दर्शन यामुळे भट्टी चांगलीच जमून आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube