SCOFilmFestival : ‘गोदावरी’ला सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

SCOFilmFestival : ‘गोदावरी’ला सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी या मराठी चित्रपटानं #SCOFilmFestival मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. याआधीही अनेक पुरस्कारांनी गोदावरी चित्रपटाचा गौरव करण्यात आला आहे.

‘गोदावरी’ चित्रपटात निशिकांतची कथा दाखवण्यात आली आहे, जो आपल्या परिवारापासून काही कारणास्तव दूर झाला आहे. मुळात अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा शोध घेण्याकरता व कधीही न तुटलेली नाती सुधारण्यासाठी पुन्हा घराची वाट पकडत असतो.

त्याच्या आयुष्यातील, कुटुंबातील गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे एका नदीजवळ त्याला मिळणार आहेत, ज्या नदीचा तो अनेक दिवस तिरस्कार करत होता. शेवटी तीच नदी त्याच्या आयुष्यातील प्रश्न सोडवते का? यावर आधारित हा गोदावरी चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

याआधी न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये ‘गोदावरी’ चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. सर्वोत्कृष्ट मराठी आर्टहाऊस सिनेमाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या चित्रपटानं इफ्फी 2021 मध्ये सुद्धा आपले सुवर्ण अक्षरात नाव कोरले आहे. ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोदावरी’ला दोन पुरस्कार प्राप्त झाले होते.

आता #SCOFilmFestival मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावल्याने मराठी चित्रपटसृष्टीत हा चित्रपट पुन्हा एका चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, ‘गोदावरी’ हा चित्रपट आम्ही कोरोना महामारीच्या काळात अगदी कमी गोष्टींचा वापर करून बनवला आहे आणि अभिमान वाटतो की आज हा चित्रपट जागतिक प्रवास करत असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांनी म्हंटलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube