BB Marathi: आर्याने अरबाजला दिला निक्कीसोबत बोलण्याचा सल्ला, बिग बॉसच्या घरात फुल्ल ऑन राडा!

BB Marathi: आर्याने अरबाजला दिला निक्कीसोबत बोलण्याचा सल्ला, बिग बॉसच्या घरात फुल्ल ऑन राडा!

Bigg Boss Marathi New Season Day 33 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील (Bigg Boss Marathi New Season ) सदस्यांमध्ये काही दिवसांपासून नाराजीचा सूर आहे. (Bigg Boss Marathi) सदस्य एकमेकांवर नाराज आहेत. निक्की (Nikki) आणि अरबाजची (Arbaaz) पहिले चार आठवडे चांगली मैत्री पाहायला मिळाली. पण आता मात्र ते एकमेकांपासून दुरावले आहेत. आजच्या भागात आर्या (Arya) अरबाजला निक्कीसोबत बोलण्याचा सल्ला देताना दिसून येणार आगे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


आजच्या ( Bigg Boss Marathi New Promo) भागात आर्या अरबाजला म्हणत आहे,”तू ज्या परिस्थितीत आहेस त्यातून मी गेली आहे. त्यामुळे मला तुला असं पाहावत नाही. तुला निक्कीसोबत बोलायचं असेल तर बोल..पण एक गोष्ट लक्षात ठेव तिने जर तुला दुखावलं तर.. तू तुझं सर्वोत्तम दे…तिच्यासोबत बोल… पण तरी पुन्हा ती असचं वागली तर परत तिच्याकडे जाऊ नको. कारण तू जेवढं तिला सांगशील एखादी गोष्ट न करण्यासाठी तेवढी ती जास्त करेल”.

अरबाज पुढे आजच्या भागात निक्कीसोबत बोलताना दिसणार आहे. अराबाज निक्कीचं बोलणं जान्हवीला मात्र चांगलच खटकत आहे. त्यामुळे निक्की म्हणतेय,”मी तुझ्यासोबत बोललेलं तुझ्या बहिणीला आवडत नाही. चांगल्या टर्मवर आपण हे थांबवूयात. अनेक दिवस आपल्याला या घरात राहायचं आहे. सगळेच मला तुझ्यापासून दूर ठेवत असतील तर मलादेखील आता एक अंतर ठेवायचं आहे”.

Bigg Boss Marathi: पाताळलोकात खतरनाक गेम रंगणार, दुसऱ्याचा पाय खेचून कोण जिंकणार?

दुसऱ्याचा पाय खेचून कोण जिंकणार?

आता या सगळ्यात कोण कोणावर भारी पडणार हे जाणून घेण्यासाठी ‘बिग बॉस’प्रेमी उत्सुक आहेत. आज या पाताळलोकात एक खतरनाक गेम रंगणार आहे. सदस्य एकमेकांचा पाय खेचताना दिसणार आहेत. दुसऱ्याचा पाय खेचून कोण जिंकणार हे पाहावे लागेल.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये टीम A आणि टीम B मधील सदस्य पाताळलोकात सोन्याची नाणी शोधताना दिसत आहेत. सोन्याची नाणी शोधून सदस्यांना ती जपायचीदेखील आहे. त्यामुळे प्रोमोमध्ये सदस्य एकमेकांचे हातपाय खेचतानादेखील दिसत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube