Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य आज BB फार्मचा कारभार सांभाळणार; पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य आज BB फार्मचा कारभार सांभाळणार; पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi New Season Day 38 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच (Bigg Boss Marathi New Season) रंगतदार टास्क पार पडत असतात. (Bigg Boss Marathi) सदस्यांसाठी यंदाचा आठवडा खूपच कठीण आहे. या आठवड्यात घरात अनेक कठीण टास्क पार पडणार आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य आज BB फार्मचा (BB Farm) कारभार सांभाळणार आहेत. (Bigg Boss Marathi New Promo ) समोर आलेल्या प्रोमोमध्ये सदस्य BB फार्मचा कारभार सांभाळताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य BB फार्मचा कारभार सांभाळताना दिसत आहेत. वैभव, अरबाज, सूरज, जान्हवी, घन:श्याम, निक्की, आर्यासह अनेक सदस्य आक्रमकपणे टास्क खेळत आहे. त्यांचा आक्रमकपणा पाहून बिग बॉस सदस्यांना चांगलीच शिक्षा सुनावणार आहेत. प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”आक्रमकतेची शिक्षा म्हणून दोन्ही टीममधील एका सदस्याला बाद करण्यात येत आहे”. ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या टास्कमधून दोन्ही टीममधले कोणते सदस्य बाद होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण सदस्य BB फार्मचा कारभार सांभाळताना पाहून प्रेक्षकांचं मात्र चांगलच मनोरंजन होणार आहे.

वर्षा ताईंच्या सौंदर्याचं रहस्य

‘बिग बॉस मराठी’च्या घरात वर्षा ताईंनी त्यांच्या फिटनेसचं आणि सौंदर्याचं रहस्य सांगितलं आहे. आजच्या UNSEEN UNDEKHA मध्ये प्रेक्षकांना हे पाहता येईल. वर्षा ताई कॅप्टन झाल्यामुळे कॅरामल कस्टर्ड बनवून घरातील सदस्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं आहे. वर्षा ताईंच्या चेहऱ्यावर आजही एक वेगळचं तेज आहे. यामागे नक्की काय रहस्य आहे असा प्रश्न नेहमीच चाहत्यांना पडत असतो. आता बिग बॉस मराठीच्या घरात वर्षा ताईंनी याबद्दल भाष्य केलं आहे.

Bigg Boss Marathi: घरातील कामांवरुन वर्षाताईंचा निक्कीवर रोख; जान्हवी अन् अभिजीतची होतेय चिडचिड

वर्षा ताई कॅरामल कस्टर्ड खात कॅमेऱ्यासमोर येऊन म्हणत आहेत,”आमच्याकडे भरपूर दूध, अंडी आणि साखर असल्यामुळे आम्ही घरी कॅरामल कस्टर्ड बनवलं. जान्हवीने वेळात वेळ काढून हे कॅरामल कस्टर्ड बनवलं आहे. कॅरामल कस्टर्ड खाताना मला खूप छान वाटतंय. आज खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की कॅप्टनसीचं सेलिब्रेशन झालंय”. कॅरामल कस्टर्ड खात वर्षा ताई पुढे म्हणत आहेत,”आता तुम्हाला कळलचं असेल माझ्या सौंदर्याचं रहस्य. मी सडपातळ असण्याचं रहस्य हेच आहे की मी सगळं खाते. प्राणायाम, योगासनं आणि घरचं जेवण करणं हेच माझ्या सौंदर्याचं रहस्य आहे”.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube