Bigg Boss Marathi : सूरज आणि पॅडीची गोलीगत मस्ती पाहिलीत का?
Bigg Boss Marathi New Season Day 38: ‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi) आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. आज सूरज (Suraj Chavan) आणि पॅडी एकमेकांसोबत गोलीगत मस्ती करताना दिसणार आहेत. आज पॅडी (Paddy) दादा सूरजला म्हणत आहेत, “पुढच्यावेळी नॉमिनेशनमध्ये (Nomination) मी तुला नॉमिनेट करणार आहे”. त्यावर पॅडी दादांना उत्तर देत सूरज म्हणतो ,”तुम्ही काहीही करा..मी भीत नाही. मी घरातल्या कोणालाच भीत नाही”. सूरज पुढे गंमतीत म्हणतो, “मी तुमच्या पोटाच्या चकल्या करेल. तोंडावर बोट ठेवा आणि शांत बसा. एकही शब्द बोलू नका”. त्यावर पॅडी दादा सूरजला म्हणतात, “तू किंग आहेस काहीही करू शकतोस”.
‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून सूरज प्रेक्षकांची मने जिंकत आहे. (Bigg Boss Marathi New Season) आता सूरज आणि पॅडीची गोलीगत मस्ती प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणार आहे.
View this post on Instagram
जान्हवी आणि घनःश्यामच्या वादाने गाठलंय टोक
‘बिग बॉस मराठी’च्या घरात काल नॉमिनेशन टास्क पार पडल्याने वातावरण तापलेलं आहे. नॉमिनेट झालेले सदस्य नॉमिनेट करणाऱ्या सदस्यांवर आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. आजच्या भागात जान्हवी आणि घन:श्यामच्या वादाने टोक गाठलेलं पाहायला मिळणार आहे. पण त्यांच्यातील वादामुळे इतर सदस्यांना मात्र काहीही फरक पडणार नाही आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागाच्या प्रोमोमध्ये जान्हवी घन:श्यामसोबत वाद घालत म्हणत आहे,”सगळ्यांना माहिती आहे तुला अक्कल नाही. अख्या घराने तुला नॉमिनेट केलं आहे. त्यावर घन:श्याम म्हणतो,”मला फरक पडत नाही. तू जेलमध्ये राहून आली आहेस. तुला अक्कल नाही”. पुढे घन:श्यामला फटकारत जान्हवी म्हणते,”अक्कल शून्य आहेस तू”.
Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्कीची मनमानी; नियमही मोडलेत
‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट
‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सदस्यांपैकी कोण आपला गेम प्लॅन अधिक चांगला आखणार? कोण सेफ होणार आणि कोण अनसेफ होणार? याकडे ‘बिग बॉस’ प्रेमींचं लक्ष लागलं आहे.