Bigg Boss OTT 2’च्या घरातून बाहेर जाणार का आलिया? नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

Bigg Boss OTT 2’च्या घरातून बाहेर जाणार का आलिया? नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी २’चे मेकर्स धक्कादायक ट्विस्ट आणि टर्नसह प्रेक्षकांना सरप्राईज करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीयत. चाहते बर्‍याच दिवसांपासून शोच्या या ओटीटी व्हर्जनची वाट पाहत आहेत. तर आता प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळत आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’ या शोचा पहिला ‘वीकेंड का वार’ (Weekend Ka War) शनिवार आणि रविवारी पार पडला आहे.

https://twitter.com/PupraG74348/status/1672977926801997824?s=20

या दरम्यान काही स्पर्धकाला या घरातून बाहेर पडावे लागणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’च्या घरात पहिल्याच आठवड्यात दुसऱ्यांदा नॉमिनेशन झाले आहे. शोचा पहिला वीकेंड एपिसोड प्रेक्षकांसह स्पर्धकांसाठी देखील मोठा धमाका होता. यावेळी भाईजानने ( Salman Khan) प्रत्येक स्पर्धकांची शाळा घेण्यास सुरुवात केली तर काहींना जागे करण्याचे कामही केले. या दरम्यान शोमध्ये दुसऱ्यांदा नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये घरातील सदस्यांनी आलिया आणि जिया यांना या आठवड्यात घरातून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट केले आहेत.

नॉमिनेशनमध्ये आल्यानंतर आलिया नाराज झाली आणि तिने पूजाला बोल लागावण्यास सुरुवात केली. दोघींमध्ये चांगलीच जोरदार बाचाबाची झाली. यावेळी जियाला अश्रू अनावर झाले. परंतु या आठवड्यात आलिया आणि जिया ऐवजी, पलक पुरस्वानीचे एलिमिनेशन झाले आहे. पलक केवळ एक आठवडाच या घरात टिकू शकणार होती. पलकच्या एलिमिनेशनमुळे आकांक्षा पुरी आणि जिया शंकर खूप इमोशनल झाल्याचे दिसून आले आहे. आकांक्षा आणि पलक या शोच्या पहिल्या भागापासूनच्या एकमेकींच्या चांगल्या जिवलग मैत्रिणी झाल्या होत्या.

Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन

दोघींनी घरात एकत्र प्रवेश केला होता. तर, पलक आणि जिया यांच्यात झालेल्या वादानंतर दोघीं परत उत्तम प्रकारे मैत्री निभावली आहे. पलक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर जिया आणि आकांक्षा भावूक झाल्याचे दिसून आले आहेत. स्पर्धक पुनीत सुपरस्टार आणि पलक पुरस्वानी हे दोघेही ‘बिग बॉस ओटीटी २’च्या घरातून अवघ्या पहिल्या आठवड्यातमध्येच बेघर झाल्याचे दिसून आले आहे. अविनाश सचदेव, बाबिका धुर्वे, जिया शंकर, आलिया सिद्दीकी, फलक नाझ, आकांक्षा पुरी, जेडी हदीद, सायरस ब्रोचा, मनीषा राणी, अभिषेक मल्हान आणि पूजा भट्ट हे ११ स्पर्धक अद्याप ‘बिग बॉस ओटीटी २’च्या घरामध्ये कैद आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube