BB OTT 2: बिग बॉसमध्ये आलियाने नवाजुद्दिनबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाली, ‘आता माझा लग्नावर…’

BB OTT 2: बिग बॉसमध्ये आलियाने नवाजुद्दिनबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाली, ‘आता माझा लग्नावर…’

BB OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी’चा (Bigg boss ott 2) दुसरा सीझन 17 जूनपासून जिओ सिनेमावरुन (Jio Cinema) प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोमध्ये यंदा बॉलीवूड (Bollywood) अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीची (Nawazuddin Siddiqui) बायको आलिया सिद्दिकीने (Alia Siddiqui) स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दिन आणि आलिया यांच्या वैयक्तिक मतभेदांमुळे जोरदार चर्चेत आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliya Siddiqui (@aaliyanawazuddin)


त्यातच आलिया सिद्दिकीने इन्स्टाग्रामवर मिस्ट्री मॅनबद्दल प्रेमाचा खुलासा केल्याने बिग बॉसमध्ये तिला अन्य स्पर्धकांकडून वैयक्तिक आयुष्याविषयी विचारणा केली जात आहे. ‘बिग बॉस ओटीटी सीझन २’ मध्ये प्रवेश केल्यावर सुरुवातीचे दोन दिवस आलिया खूपच शांत दिसून आली होती. परंतु तिसऱ्या दिवशी एका सहस्पर्धकाबरोबर बातचीत करत असताना आलियाने नवाज आणि तिच्या नात्याविषयी मोठा खुलास केला आहे.

यावेळी आलिया सिद्दिकीने सहस्पर्धकाला ती, नवाजुद्दिनला केव्हा भेटली, त्यानंतर त्यांच्या प्रेमकहाणीला कशी सुरुवात झाली याबाबत तिने मोठा खुलासा करणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच सहस्पर्धक सायरस ब्रोचाशी बोलत असताना आलिया सिद्दिकी म्हणाली की, “२००३ मध्ये मी नवाजला भेटले होते. तेव्हा त्याचा भाऊ त्याचा असिस्टंट होता. नवाज तेव्हा एकता नगरमध्ये आणि मी पीजीमध्ये राहत होते.

पीजी सोडल्यानंतर नवाजच्या भावाने मला काही दिवस त्यांच्यासोबत राहण्यास सांगितले होते. मी नवाजचा फोटो बघितला, तेव्हा त्याचे डोळे मला खूप आवडले. त्यानंतर आम्ही भेटलो, प्रेमात पडलो आणि एकत्र राहू लागलो होतो, असा आमचा प्रवास होता आणि आता मतभेदांमुळे परस्पर संमतीने घटस्फोट घेणार आहोत. आलियाला सायरस ब्रोचाने पुढे तिच्या अलीकडेच प्रेमाची कबुली दिलेल्या मिस्ट्री मॅनबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, तो भारतीय नसून इटालियन आहे, आणि दिसायला खूप छान आहे.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

माझ्या एका मैत्रीणीला तो खूप आवडत आहे, तेव्हा आमच्यामध्ये काही देखील नव्हते. आम्हीनंतर हळूहळू एकमेकांना बोलू लागलो होतो. तो सॉफ्टवेअर इंजिनीअर असून माझ्याबद्दल त्याच्या मनात खूप आदर आहे. म्हणूनच सर्वांसमोर मी माझे दुसरे प्रेम मान्य केले आहे, मी आता घाबरत नाही, कारण तो नेहमी माझ्यासोबत असतो. मिस्ट्री मॅनसोबत लग्न करणार का? याविषयी सायरस ब्रोचाला आलिया म्हणाली की, “नाही रे! या जन्मात मी पुन्हा लग्न करणार नाही. माझा आता लग्नावर विश्वास राहिलेला नाही. दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी सीझन २’ चाहत्यांना आता जिओ सिनेमा आणि व्हूटवर विनामूल्य बघता येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube