Bigg Boss OTT 2: भाईजानने नवाजुद्दीनच्या बायकोला जोरदार फटकारलं; म्हणाला, ‘खासगी आयुष्याबद्दल…’

Bigg Boss OTT 2: भाईजानने नवाजुद्दीनच्या बायकोला जोरदार फटकारलं; म्हणाला, ‘खासगी आयुष्याबद्दल…’

Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन (Bigg Boss OTT 2) नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या सिझनच्या पहिल्या ‘वीकेंड का वार’ एपिसोड एका मोठ्या ड्रामाने सुरुवात झाली. बिग बॉसच्या पहिल्या दिवशी सुपरस्टार पुनीतला (Superstar Puneet) शोमधून बाहेर हाकलण्यात आले होते. त्यानंतर खूप मोठा ड्रामा झाला होता. तर आता भाईजानने नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये आकांक्षा पुरीची (Akanksha Puri) चांगलीच शाळा घेतली आहे.

त्याचबरोबर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीची (Nawazuddin Siddiqui) पत्नी आलिया सिद्दिकीलाही (Alia Siddiqui) भाईजानने (Salman Khan) चांगलेच फटकारले आहे. बिग बॉसच्या ‘वीकेंड का वार’मध्ये बेबिका धुर्वेविषयी आकांक्षा खोटं बोलली होती. या सर्व गोष्टींमुळे भाईजान तिच्यावर भडकला होता.  बेबिका आणि आकांक्षा यांच्यामधील वादाच्या दरम्यान भाईजानने आलिया सिद्दिकीलाही चांगलेच सुनावले आहे.

“तू त्यांना बोलावण्याऐवजी तिला शांत करण्याचा प्रयत्न करू शकली असती”, असं तो तिला यावेळी म्हणाला आहे. इतक्या आकांक्षा पुन्हा मध्ये बोलते. “म्हणूनच मी तिच्याशी बोलणं बंद केलं होतं. आलिया आणि मी सुट्ट्यांच्या बाबतीत आणि खासगी आयुष्याविषयी गप्पा मारत होतो आणि बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या घटनांचा त्यात काहीच संबंध नव्हता”, असं स्पष्टीकरण आकांक्षाने यावेळी दिले आहे.

Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन

आकांक्षाचे हे स्पष्टीकरण ऐकल्यावर भाईजान तिला म्हणतो, “तुम्ही अशा गप्पा का मारत होता? बिग बॉसच्या घराला त्याच्याशी काही देखील देणं घेणं नाही. जर तुम्हाला गप्पा मारायच्या असतील तर घराबद्दल बोला. आम्हाला आलियाचे खासगी आयुष्य आणि तिच्या सुट्ट्यांविषयी जाणून घेण्यात काही रस नसल्याचे भाईजानने सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube