‘The Kerala Story’वरून टीका करणाऱ्या केदार शिंदेंना, भाजपाच्या ‘या’ नेत्यानी फटकारलं

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 08T172049.846

Atul Bhatkhalkar Slams kedar Shinde: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचे दिसून येत आहे. तसेच या सिनेमाच्या आशयावरून वादात अडकलेल्या या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. पण कोर्टाने त्यास नकार दिला आणि हा सिनेमा ५ मे रोजी देशभरामध्ये प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाला चाहत्यांनी देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे.

अशातच अनेक ठिकाणी सिनेमा टॅक्स फ्री देखील करण्यात आला आहे. तसेच यानंतर ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक ट्वीट केले होते. महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी काही राजकीय तसेच सामाजिक संघटनांकडून ‘द केरला स्टोरी’चे मोफत शो आयोजित करण्यात येत आहेत, असे केदार शिंदे (kedar Shinde) यावेळी म्हणाले होते.

दुर्दैव… महाराष्ट्रामध्ये ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातील नेते आयोजित करून लोकांना मोफत दाखवत आहेत. तसेच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र शाहीर’ देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का? असं ट्वीट त्यांनी केलं होते. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत केदार शिंदेंवर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

‘केदार शिंदे साहेब, ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा केवळ महाराष्ट्रामध्येच चालत नाही तर संपूर्ण देशभरात चालत आहे. कारण तो जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तो सिनेमा चालला तर तुमच्या पोटात का दुखतंय? हिंदुंच्या हिताच्या ४ गोष्टी समोर येत आहेत म्हणून? यामुळे एवढंच सांगणार आहे, कोरोनाच्या काळात स्वित्झर्लंडला जाऊन राहावसं वाटतं, ही तुमची देशभक्ती आहे. म्हणून उगाच हिंदुत्वाच्या आणि हिंदू समाजाच्या आड येण्याचा प्रयत्न करू नका, असं उत्तर केदार शिंदे यांच्यावर टीका करत अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar ) यांनी यावेळी दिले आहे.

Tags

follow us