‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ फिल्म रिव्ह्यू

‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ फिल्म रिव्ह्यू

एखाद्या फिल्ममेकरसाठी सगळ्यात मोठं चॅलेंज काय असू शकतं? तर पूर्ण चित्रपट एखाद्या कलाकाराला डोळ्यासमोर ठेऊन विचार केलेला असतो आणि अचानक त्या कलाकाराचे निधन होते. हेच घडलं मार्वलच्या ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ ह्या चित्रपटाच्या वेळी. ब्लॅक पँथरला खरी ओळख मिळाली ती चॅडविक बोसमनच्या भूमिकेने. पण 2020 मध्येच सुपरहिरो ब्लॅक पँथर उर्फ ​​सम्राट टीचालाची भूमिका करणारा चॅडविक बोसमनचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. त्यामुळे पुढचा ब्लॅक पँथर कोण याची प्रक्षेकांना उत्सुकाता होती. आणि फायनली ब्लॅक पँथर पुन्हा आलाय.

मार्वलचा ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झालाय. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झालेल्या ब्लॅक पँथरचा सिक्वेल आहे. दिग्दर्शक रायन कूगलरने सिक्वेलमध्ये ब्लॅक पँथरची भूमिका करण्यासाठी कोणत्याही कलाकारांना कास्ट केले नाही. त्यांनी चित्रपटात चॅडविक बोसमनला श्रद्धांजली वाहिलीय. जेव्हा चॅडविक बोसमनचे व्हिडिओ स्क्रीनवर येतात तेव्हा सिनेमागृहातील संपूर्ण वातावरण इमोशनल होऊन जातं. रायनने या व्हिडिओमध्ये कोणतेही संगीत दिले नाही.

आता पाहूाया ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ची कथा
चित्रपटाच्या सुरुवातीला वाकांडाचा सम्राट टीचाला म्हणजे चॅडविक बोसमनला जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागतोय. त्याची बहीण शुरी आणि आई क्विंन रॅमोंडा सम्राटाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात, परंतु जीवन औषधी वनस्पती उपल्बध नसल्याने ते व्यर्थ ठरतात. मागील चित्रपटात टीचालाच्या चुलत भावाने सिंहासनावर आरूढ होताच सर्व जीवन औषधी वनस्पती जाळून टाकलेली असते. टीचालाच्या मृत्यूनंतर क्विंन झालेली रॅमोंडा जगातील इतर देशांना व्हायब्रेनियम देण्याला नकार देते.

त्यानंतर रिरी नावाची विद्यार्थ्यानी व्हायब्रेनियम शोधणारे यंत्र बनवते. इतर देशांचे लोक या यंत्राच्या मदतीने समुद्राच्या खोलात व्हायब्रेनियमला शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु तेथे काही अज्ञात लोक त्यांच्या पथकावर हल्ला करतात. ही शोध मोहीम चालवणाऱ्या अमेरिकनांना वाटते की या हल्ल्यमागे वाकांडाचा हात आहे आणि ते त्यांच्याविरुद्ध युद्धाची तयारी करू लागतात.

याचवेळी वाकांडाच्या लोकांचा सामना नेमोर या अनोख्या व्यक्तीशी होतो.. त्याच्याकडेही भरपूर व्हायब्रेनियम असल्याचा दावा तो करतो. पण पृथ्वीवरील इतर देश त्यांच्याकडे असलेले व्हायब्रेनियम शोधत आहेत. म्हणून त्याला त्या देशांना धडा शिकवायचा आहे. नेमोर वकांडांना धमकी देतो की जर त्यांनी या युद्धात त्यांला मदत केली नाही तर तो प्रथम त्यांचा नाश करेल. त्यामुळे ब्लॅक पँथरच्या मृत्यूनंतर संपूर्ण जगाच्या आव्हानांचा तसेच या नवीन शत्रूला सामोरे जाण्याची जबाबदारी शुरीच्या खांद्यावर येते. शुरी या दोन्ही आव्हानांचा सामना करू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात जावे लागेल.

या चित्रपटाचे दिग्दर्शक रायन कूगलर यांनी एक अप्रतिम सिनेमा तयार केलाय, जो तुम्हाला थोडा वेळही बोअर करीत नाही. साधारणपणे हॉलिवूड चित्रपट दोन तासांपेक्षा जास्त नसतात, पण हा चित्रपट पावणेतीन तास तुमचे मनोरंजन करतो. चित्रपट तुम्हाला हसतो तसेच रोमांचित करतो आणि तो इमोशनलही करतो.

या चित्रपटातील नेमोर या नव्या पात्राने उत्तम अभिनय केलाय आणि लेटिशिया राइट वाकांडाची नवीन तारणहार म्हणून उत्कृष्ट काम करते. चित्रपटातील बाकीची पात्रेही त्यांची उत्तम भूमिका पार पाडतात. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी जबरदस्त आहे. विशेषतः समुद्राच्या आतील दृश्ये तुम्हाला आश्चर्यचकित करतील. त्याच वेळी, संगीत आणि पार्श्वसंगीत देखील जबरदस्त आहे. मध्यंतरानंतर चित्रपट आणखीनच जबरदस्त बनतो. विशेषत: चित्रपटाचा क्लायमॅक्स खूपच सुंदर आहे.

या चित्रपटात स्त्रीशक्तीचे दर्शन घडते. स्त्री पात्रामुळे अॅक्शन सीन किंवा व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही. चित्रपटात तुम्हाला प्रत्येक पावलावर ब्लॅक पँथरची आठवण येईल. रायनने बहुधा मुद्दाम ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला नसेल. मार्वलच्या महिला सुपरहिरोच्या यादीत आता शुरी, रिरी विल्यमचीही नावे समाविष्ट होतील. जर तुम्हाला ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ बघायचा असेल त्या आधी त्याचा प्रीक्वल ‘ब्लॅक पँथर’ पाहून घ्या..

चित्रपटाला 5 पैकी 4 स्टार..

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube