Naseeruddin Shahच्या मुलीचे बर्थ सर्टिफिकेट SDM ने थांबवले? नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

Naseeruddin Shahच्या मुलीचे बर्थ सर्टिफिकेट SDM ने थांबवले? नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

Naseeruddin Shah Daughter: अलीगढमधील एसडीएम यांनी बॉलिवूड (Bollywood) अभिनेता नसीरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) यांची हिबा या मोठ्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. सर्टिफिकेट (Certificate) हवे असेल तर त्यांच्या घरातील प्रमुख व्यक्तीने अर्ज करावा लागणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. यासोबतच यामागचे कारण देखील आपल्याला स्पष्ट करावा लागणार आहे.  परंतु त्यांना आता 53 वर्षांनंतर जन्म प्रमाणपत्राची गरज का भासली? असा सवाल देखील विचारला जात आहे.

अभिनेत्याने एएमयूच्या एका प्राध्यापक मित्रामार्फत मुलगी हिबाच्या जन्म प्रमाणपत्रासाठी महापालिकेकडे (Municipal Corporation) अर्ज केला होता. त्यात त्यांनी सांगितले आहे की, त्यांच्या मुलीचा जन्म 20 ऑगस्ट 1970 रोजी अलीगढमधील टिकाराम नर्सिंग होममध्ये झाला. तसेच मुलीचे प्रमाणपत्र जारी करा. असा अर्ज यावेळी त्यांनी केला आहे.

तब्बल 53 वर्षांनंतर हे प्रमाणपत्र मागवण्यात आल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त राकेशकुमार यादव यांनी सांगितले आहे. त्यामुळे नियमानुसार महापालिकेने याप्रकरणी एसडीएमचा अहवाल मागवला आहे. यानंतर एसडीएम स्तरावरून अर्ज फेटाळण्यात आला आहे. महापालिका आयुक्त या अर्जावर म्हणाले आहेत की, अर्जात अनेक त्रुटी आहेत, प्रमाणपत्र हवे असल्यास हिबाच्या घरातील प्रमुख व्यक्तीने अर्ज करावा लागणार आहे. सोबतच त्यांच्या जन्मतारखेबाबत कोणतेही दस्तऐवज किंवा शपथपत्र द्यावे लागणार आहे.

HP Rain: मनालीच्या पुरात अभिनेता अडकला; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “घरी परतण्याचा…”

परंतु त्यांना 53 वर्षांनंतर त्यांना या प्रमाणपत्राची गरज का भासली?  हे देखील कारण त्यांना आता स्पष्ट करावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांना प्रमाणपत्र देण्याबाबत विचार केलाजाणार आहे. बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शहा हे मूळचे बाराबंकीचे आहेत. त्यांनी १९६७ ते १९७० पर्यंत अलिगडमध्ये शिक्षण घेतले आहे. दरम्यान १९७० मध्ये त्यांची पहिली पत्नी मनारा हिची मोठी मुलगी हिबा हिचा जन्म झाला आहे.

यानंतर नसीरुद्दीनची भेट अभिनेत्री रत्ना पाठकशी झाली आणि हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांनी मनाराशी घटस्फोट घेतला आणि १ एप्रिल १९८२ मध्ये रत्नासोबत लग्न केले होते. नसीरच्या पहिल्या बायकोचे रत्नासोबत लग्न झाल्यानंतर लगेचच निधन झाले होते. नसीरुद्दीन यांचे मोठे भाऊ जमीरुद्दीन शहा हे अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू राहिले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube